सिद्धांतसोबत झळकणार मृणाल ठाकूर
दोन दीवाने सहर में चित्रपटासाठी जमणार जोडी
संजय लीला भन्साळीच्या प्रॉडक्शन्स अंतर्गत निर्माण होणारा चित्रपट ‘दो दीवाने सहर में’चा फर्स्ट लुक समोर आला आहे. निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. जारी करण्यात आलेल्या फर्स्ट लुकमध्ये सर्वप्रथम पाण्यात पडलेले पान दिसून येते, त्यानंतर दोन चहाच्या ग्लासांसह दोन हात दिसून येतात. मग फुलांवर भिरभिणारी फुलपाखरं दिसून येतात. यानंतर पर्वतांचे दृश्य असून मेट्रोमध्ये एक इसम प्रवास करताना दिसून येतो. मग पूलानजीक बसलेले एक जोडपे दिसून येते.
दो दीवाने सहर में या चित्रपटाचे दिग्दर्शन रवि उदयवार करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि संजय लीला भन्साळी यांच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. याचे निर्माते संजय लीला भन्साळी, प्रेरणा सिंह, उमेश बन्सल आणि भरत सिंह रंगा आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच सिद्धांत आणि मृणाल यांची जोडी पाहता येणार आहे.