महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपावर जोरदार घासाघीस! ममता- अखिलेश यांचा जागांसाठी आग्रह

06:07 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘इंडिया’ आघाडीतील वाद सुटेना : ममता-अखिलेश काँग्रेसला अधिक जागा देण्यास नाइच्छुक : पंजाबमध्ये आप ताठर  

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’मध्ये जागावाटपासमेत आघाडीचा प्रमुख तसेच संयोजक पदावरून असमंजसाची स्थिती आहे. शनिवारी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत आघाडी प्रमुखपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर सहमती झाली, परंतु संयोजकाच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही. तर दुसरीकडे जागावाटपात हो असलेल्या विलंबामुळे संजद नाराज आहे. उत्तरप्रदेश, बंगाल आणि पंजाबमधील जागावाटपासंबंधी मतैक्य होणे दूरची गोष्ट ठरली आहे.

जागावाटप लवकर व्हवे आणि संयुक्त प्रचार सुरू व्हावा अशी आमची भूमिका आहे. निवडणुकीला आता केवळ 2 महिने राहिले असून जागावाटप अद्याप झालेले नाही. हीच मोठी समस्या आहे. परंतु रालोआत देखील जागावाटप झालेले नाही पण भाजपचे संघटन, जनशक्ती आणि धनशक्ती अत्यंत मजबूत असल्याचे उद्गार संजदचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी काढले आहेत.

काँग्रेस 6 जागांसाठी आग्रही

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत, यातील 6 जागांकरता काँग्रेस आग्रही आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी या काँग्रेसला 2 पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाहीत. यामुळे पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला निर्माण हेण्याची चिन्हे नाहीत. याचमुळे ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीपासून अंतर राखू लागल्या आहेत. सध्या काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात जागावाटपावरून कुठलीच औपचारिक बैठक देखील झालेली नाही.

पंजाबमध्ये 8 जागांवर दावा

पंजाबमध्ये लोकसेच्या 13 जागा आहेत, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी डिसेंबरमध्ये भटिंडा येथील सभेत ‘आप’ला सर्व 13 जागांवर विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले होते. यामुळे आपकडून पंजाबमधील सर्व 13 जागांवर दावा करण्यात येत ओह. काँग्रेस यातील 8 जागांवर दावा करत आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यावर आम आदमी पक्ष राज्यात काँग्रेसकरता 8 जागा सोडण्यासाठी तयार नाही.

दिल्लीत जागावाटपावर सहमती

दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून सहमती झाली आहे. काँग्रेसने दिल्लीत 5 जागांची मागणी केली होती, परंतु आप 4 तर काँग्रेसकडून 3 जागा लढविल्या जाण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशात 10 जागा सोडण्याची तयारी

उत्तरप्रदेशात जागावाटपावरून शुक्रवारी काँग्रेस आणि सप यांच्यात बैठक प्रस्तावित होती. परंतु काँग्रेसने अंतिमक्षणी ही बैठक टाळली होती. उत्तरप्रदेशातील 20-25 जागा लढविण्याची काँग्रेसची इच्छा आहे, परंतु समाजवादी पक्ष काँग्रेसकरता 10 हून अधिक जागा सोडण्यास तयार नाही. सप स्वत: किमान 60 जागांवर निवडणूक लढवू पाहत आहे. तर स्वत:चा घटक पक्ष रालोदला 5 जागा देण्याची त्याची तयारी आहे. अशा स्थितीत काँग्रेससाठी उत्तरप्रदेशात केवळ 15 जागाच सोडता येणार आहेत.

बिहारमध्ये 4 जागांचा प्रस्ताव

बिहारमध्ये जागावाटपावरून झालेल्या बैठकीत संजद-राजदला प्रत्येकी 17 तर काँग्रेसला 4 आणि डाव्या पक्षांकरता 2 जागा सोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, परंतु काँग्रेस बिहारमध्ये 8-10 जागांची मागणी करत आहे. संजद-राजदला प्रत्येकी 16 तर काँग्रेसला 6 आणि डाव्या पक्षांना 2 जागा देण्याच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर सहमती होऊ शकते. परंतु नितीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा देखील सुरू आहे.

उर्वरित राज्यांमधील सिथती

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाकरता 2 जागा सोडल्या जाऊ शकतात. हरियाणात आम आदमी पक्ष निवडणूक लढवू पाहत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आपकरता एकही जागा सोडण्यास तयार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे आघाडी अंतर्गत निवडणूक लढविणार आहेत. जम्मूच्या 2 जागा आणि लडाखच्या एका जागेवर काँग्रेस दावा सांगत आहे, अशा स्थितीत नॅशनल कॉन्फरन्स दोन तर पीडीपी एका जागेवर निवडणूक लढवेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article