महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिम्समधील अव्यवस्थेची चौकशी व्हायला हवी

11:16 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : बाळंतिणीच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया

Advertisement

बेळगाव : बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेत (बिम्स) अव्यवस्था प्रकर्षाने दिसून येत असून चौकशी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिणीचा बिम्समध्ये मृत्यू झाला असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने बिम्समध्ये काही उपचारांची कमतरता असून ती दूर करून बिम्सच्या सेवेत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी आपण बिम्सला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली होती. आता आणखी एक वेळ भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisement

गृहलक्ष्मी योजनेत अडथळा नाही

राज्यात बीपीएल कार्ड रद्द करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर मंत्री हेब्बाळकर यांनी प्रतिक्रिया दिली. गृहलक्ष्मी योजना सुरळीतपणे सुरू आहे. एपीएल आणि बीपीएल कार्ड असलेल्यांना व ज्यांना प्राप्तीकर भरावा लागत नाही, अशानाही गृहलक्ष्मीचा लाभ देण्यात येत आहे. 80 हजार बीपीएल रेशनकार्डे रद्द करून ती एपीएममध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे कोणताही गोंधळ झालेला नाही. एपीएल व बीपीएल कार्डे असणाऱ्यांना गृहलक्ष्मीचा लाभ मिळतच आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यात काँग्रेस सरकारला खरेदी करण्याचा विचार सुरू असल्याच्या विचारावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. संपूर्ण देशात असे गैरप्रकार सुरू आहेत. भाजप असे प्रयत्न वारंवार करीत आहे. पण काँग्रेसचे आमदार पक्षनिष्ठ आहेत. सुरक्षित काँग्रेस सरकारला कोणीही काहीच करू शकत नाही, असे हेब्बाळकर म्हणाल्या. मंत्रिमंडळ रचनेबद्दल आपणालाही काही माहिती नाही. व मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल या बाबीवरही चर्चा झालेली नाही. 9 डिसेंबरपासून बेळगावात 10 दिवस विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असून अधिवेशनात या भागातील समस्यांवर चर्चा करण्यात येईल. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याबाबत चर्चा होईल. जिल्हा विभाजनाबाबत जिल्ह्यातील सर्व आमदारांबरोबर यापूर्वी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली आहे. आता अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून जिल्हा विभाजनाला संमती मिळविण्याचे प्रयत्न करू. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान आपणही महाराष्ट्रात जाऊन काही दिवस प्रचार केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. तसेच राज्यात नुकत्याच झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच विजयी होईल, असा विश्वासही मंत्री हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

बाळंतिणीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करणार : पालकमंत्री

बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेत (बिम्स) बाळंतिणीच्या मृत्यूप्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. चौकशीसाठी तीन जणांची एक समिती नेमण्यात आली असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बुधवार दि. 20 रोजी माध्यम प्रतिनिधींसमोर ते बोलत होते. जिल्ह्यासह राज्याच्या जवळजवळ सर्वच भागांत पावसाचा जोर थांबला आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खाच-खळगे बुजविण्याचे काम सुरू आहे. 40 वर्षांनंतर यंदाच जोरदार पाऊस झाला असून राज्यातील अनेक भागांत रस्त्यांची वाताहत झाली आहे. नादुऊस्त रस्त्यांची दुऊस्ती व रस्त्यांवरील खाच-खळगे बुजविण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सुवर्णसौधमध्ये 9 ते 20 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वतोपरी व्यवस्था करण्यात येत आहे. fिवधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे संयुक्तपणे अधिवेशन होत असून अधिवेशनाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार आहेत. सभागृहांची स्वच्छता व रंगरंगोटीला प्राधान्य देऊन अतिरिक्त निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article