महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगाव उद्यानाच्या पदपथावरील उखडलेली फरशी धोकादायक

11:50 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : मडगाव पालिकेसमोरील उद्यानाच्या पदपथावरील गटाराची उखडलेली फरशी पादचाऱ्यांना धोकादायक बनली असून कित्येकांच्या पायांना इजा पोहोचल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेने याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे. या पदपथावरील कित्येक ठिकाणी पेव्हर्स उखडले आहेत. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावे लागतात तसेच इजा पोहोचत आहे. काही दिवसांपूर्वी एक इसमाने पेव्हर्स बरोबर नसल्याने त्यात पाय अडकून पडल्याने आपल्या मुलीच्या गुडघ्याला इजा पोहोचल्याचे पालिकेच्या अभियंत्याच्या नजरेस आणून दिले होते. पालिकेवर एकंदर पालिका क्षेत्रातील पदपथांची देखरेख तसेच दुरुस्तीची जबाबदारी राहते. मात्र पालिका आपल्या इमारत परिसरातील धोकादायक बाबींकडे देखील दुर्लक्ष करत असल्याबद्दल मडगाववासियांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article