For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपहरणाच्या 73 वर्षांनी लागला शोध

06:08 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपहरणाच्या 73 वर्षांनी लागला शोध
Advertisement

परिवाराला जिवंत मिळाला अपहृत इसम

Advertisement

73 वर्षांपूर्वी अपहरणाचा शिकार ठरलेला मुलगा आता वृद्धावस्थेत परिवाराला भेटल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. डीएनए चाचणीमुळे या व्यक्तीला शोधण्यास यश मिळाले. 21 फेब्रुवारी 1951 मध्ये लुइस अरमांडो अल्बिने केवळ 6 वर्षांचा असताना अमेरिकेच्या वेस्ट ओकलँड पार्कमधून एका महिलेने त्याचे अपहरण केले होते.

अल्बिनो पार्कमध्ये स्वत:च्या 10 वर्षीय भावासोबत खेळत असताना एका महिलेने कँडी देण्याचे आमिष दाखवून त्याला स्वत:सोबत नेले होते. त्यावेळी पोलिसांसमवेत एफबीआयने देखील याप्रकरणी तपास केला होता. परंतु लुइस अल्बिनोचा थांगपत्ता लागला नव्हता.

Advertisement

2005 मध्ये आईचे निधन

अल्बिनोचा जन्म प्यूर्टो रिकोमध्ये झाला होता, परंतु त्याची आई नंतर वेस्ट ओकलँडमध्ये राहू लागली होती. अपहरणानंतर महिलेने एका दांपत्याच्या स्वाधीन त्याला केले होते. दांपत्याने अल्बिनोचे स्वत:च्या मुलाप्रमाणे पालनपोषण केले होते. 2005 मध्ये अल्बिनोच्या आईचे निधन झाले. त्याच्या आईला अखेरच्या क्षणांपर्यंत स्वत:चा मुलगा जिवंत असल्याचा भरवसा होता.

वृत्तपत्रांची कात्रणं ठरली उपयुक्त

ओकलँडमध्ये राहणारी 63 वर्षीय महिला एलिडा एलेक्विन यांनी अल्बिनो यांचा शोध लावला आहे. महिलेन डीएनए चाचणी आणि वृत्तपत्रांच्या कात्रणाच्या मदतीने स्वत:च्या मामाचा शोध लावला आहे. यात पोलीस, एफबीआय आणि न्याय विभागाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अपहृत अल्बिनो आता आजोबा झाला आहे.

थट्टेत केली होती डीएनए चाचणी

एलेक्विनने मस्करीच्या नादात एकदा ऑनलाइन डीएनए चाचणी करविली तेव्हा तिला स्वत:चा मामा जिवंत असल्याची अपेक्षा जाणवली. प्रत्यक्षात 22 टक्क्यांपर्यंत तिचा डीएनए एका इसमाशी मिळताजुळता निघाला. यानंतर महिलेने स्वत:च्या मुलींसोबत त्या इसमाविषयी ऑनलाइन शोध घेण्यास सुरुवात केली. काही छायाचित्रे प्राप्त झाल्यावर मामा जिवंत असल्याचा विश्वास झाला. यानंतर ओकलँड पब्लिक लायब्रेरीत महिलेला ओकलँड ट्रिब्यूनच्या लेखांच्या मायक्रोफिल्ममध्ये अल्बिनो आणि रोजरची छायाचित्रे मिळाली. यानंतर महिलेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लुइस अल्बिनोला अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून शोधून काढले. यानंतर अल्बिनो आणि त्याची बहिण म्हणजेच एलेक्विन यांच्या आईने डीएनए टेस्ट करविली. तपासणीत दोघेही भाऊबहिण निघाले.

परिवाराला भेटले अल्बिनो

माझे एक मामा असल्याचे मला ठाऊक होते. आम्ही त्यांच्याविषयी खूप बोलायचो. माझी आजी स्वत:च्या थैलीत वृत्तपत्राची कात्रणं ठेवायची असे एलेक्विनने सांगितले. जून महिन्यात अल्बिनो यांनी स्वत:च्या कुटुंबीयांची भेट घेतली. अल्बिनो हे फायर फायटर आणि मरीन कॉर्प्समधून निवृत्त झाले आहेत. तसेच दोनवेळा व्हिएतनाममध्ये सेवा बजावली आहे.

Advertisement
Tags :

.