कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सीएसके’च्या कोंदणातील हिरा...आयुष म्हात्रे !

06:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यंदाच्या ‘आयपीएल’नं अनेक कोवळ्या चेहऱ्यांना संधी दिलीय आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनीही त्याचा फायदा उठवत आपली मोहर उमटविलीय...यात राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी, पंजाब किंग्सचा प्रियांश आर्य यांच्याबरोबर समावेश होतो तो चेन्नई सुपर किंग्सच्या आयुष म्हात्रेचाही...मुंबई ते ‘सीएसके’ या आयुषच्या विलक्षण प्रवासावर टाकलेली ही नजर...

Advertisement

वर्ष 2018...चेन्नई सुपर किंग्सनं (सीएसके) इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुन्हा पाऊल ठेवलं होतं ते दोन वर्षांच्या बंदीला तोंड दिल्यानंतर...त्यांनी लिलावाच्या वेळी निवड केली ती वरिष्ठ खेळाडूंचीच अन् 19 वर्षांखालील जगज्जेत्या भारतीय संघातील शुभमन गिल, पृथ्वी शॉ, रायन पराग, अभिषेक शर्मा वगैरे प्रतिभावान युवा खेळाडूंकडे पाहिलं सुद्धा नाही. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी ‘सीएसके’ला ‘डॅड्स आर्मी’ म्हणायला प्रारंभ केला होता...मालक एन. श्रीनिवासन यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की, धोनीच्या मते, आयपीएलमध्ये अनुभवाला पर्याय नाहीये. तुम्हाला संघ कसा चमकतो ते लवकरच कळेल...कर्णधार धोनीची भूमिका अक्षरश: सार्थ ठरली आणि चेन्नई सुपर किंग्सनं त्यानंतरच्या सहा वर्षांत ‘आयपीएल’चा किताब जिंकला तो तब्बल तीन वेळा...

Advertisement

परंतु 2024 साल उजाडलं नि तडे पडण्यास प्रारंभ झाला. यावेळी तर पाठीराख्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील त्यांची मोहीम संपली...त्यानंतरच्या दिवसांत हळूहळू चेन्नईच्या भूमिकेत बदल होण्यास प्रारंभ झालेला असून आता दर्शन घडतंय ते कोवळ्या मुलांचं तसंच विशीतील तरुणांचं. त्यात समावेश 20 वर्षांच्या शेख रशिदचा, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेव्हिसचा, वंश बेदीचा, आंद्रे सिद्धार्थचा आणि 17 वर्षं 294 दिवसांच्या, तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रेचा...

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी 214 धावांची आवश्यकता असलेल्या ‘सीएसके’नं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली आणि त्यात फार मोठा वाटा होता तो आयुष म्हात्रेचा. त्यानं दर्शन घडविलं ते वयाला न शोभेल अशा प्रगल्भ वृत्तीचं. हा ‘पॉकेट हर्क्युलस’ संघातील कित्येक वरिष्ठ खेळाडूंपेक्षा जास्त भरवशाचा वाटला...आपल्या डावातील फिरकी गोलंदाज कृणाल पंड्याचा चौथाच चेंडू आयुषनं पुढं सरसावत मैदानाच्या बाहेर भिरकावला आणि त्यानंतर अचूक भुवनेश्वर कुमारला तर अक्षरश: तुडवलं. चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळविणं शक्य झालेलं नसलं, तरी त्यानं 48 चेंडूंत झोडपलेल्या 94 धावा यादगार ठरल्या...

म्हात्रेनं मुंबईतर्फे पदार्पण केलं ते गेल्या मोसमात, तर ‘सीएसके’नं त्याला उचलण्याचा निर्णय घेतला तो कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यामुळं. आयुषनं पाच वेळा जेतेपद मिळविणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात प्रवेश केला तेव्हा इंडियन प्रीमियर लीगला तीन आठवड्यांहून जास्त काळ लोटला होता. त्यानं दबावाची अजिबात पर्वा न करता मुंबई इंडियन्सला 15 चेंडूंत 32, तर सनरायझर्स हैदराबादला 19 चेंडूंत 30 धावांचा प्रसाद दिला. आयुष म्हात्रेला टी-20 मधील एक परिपूर्ण खेळाडू म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये आणि खुद्द ‘सीएसकेचे’ प्रमुख प्रशिक्षक व न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांना देखील तसंच वाटतंय...

आयुष म्हात्रेत गुणवत्ता अगदी ठासून भरलीय...हात व डोळे यांच्यातील समन्वय अक्षरश: अप्रतिम आणि बॅटचा ‘सिल्की स्विंग’ भात्यात असलेला फलंदाज असंही त्याचं वर्णन करता येईल....‘फटके प्रत्येक फलंदाजाजवळ असतातच. पण त्यांचं मोठ्या मंचावर न घाबरता, कुठल्याही दबावाला बळी न पडता दर्शन घडविणं हे अत्यंत महत्त्वाचं. मला त्यामुळंच तो आवडतोय’, फ्लेमिंग यांचे शब्द...‘आयुषचा मुंबईचा ड्रेसिंग रूम ते चेन्नई सुपर किंग्सचा तंबू हा प्रवास कुठल्याही अडथळ्याविना सहज झालाय. ‘सीएसके’चा संघ ओळखला जातोय तो त्यांच्या शांत, संयमी वातावरणासाठी. म्हात्रेला तिथं शिवम दुबेसारख्या मुंबईच्याच खेळाडूंना भेटण्याची संधी मिळालीय. मला फार आवडतेय ती त्याची प्रगल्भता. तो प्रत्येक लढतीच्या वेळी अगदी आरामात असतो’, स्टीफन फ्लेमिंग त्याचे गुणविशेष सांगताना पुढं म्हणतात !

प्रतिभावान आयुष...

आयुषची प्रभावी वाटचाल...

वडिलांची साथ...निराशेवर मात !

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article