महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळेच उपनगरांचा विकास

04:52 PM Nov 14, 2024 IST | Radhika Patil
The development of suburbs is due to MLA Ruturaj Patil.
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळेच दक्षिण मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. उपनगरांचा विकास आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळे झाला आहे असे प्रतिपादन सामाजीक कार्यकर्ते दुर्वास बापू कदम यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील शारदा विहार आणि सासणे उद्यान येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

आमदार सतेज पाटील म्हणाले, शहरातील सर्व रस्ते 100 टक्के पूर्ण करणे, ड्रेनेज लाईन पुर्ण करणे यासाठी आमदार ऋतुराज पाटील व मी प्रयत्नशील आहे. कोल्हापूरातील आयटी पार्कचा प्रश्न लवकरचं मार्गी लागेल. उपनगरामध्ये नऊ वातानुकूलित बसेस दिल्या आहेत. आणखी 25 बसेस केएमटीच्या ताफ्यात लवकरच उपलब्ध होतील. उपनगरामध्ये आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील आणि मी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा विधानसभेसाठी संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रकाश जाधव म्हणाले, विकासाचे सर्वसमावेश सूत्र आणि त्यांचे कामावरील निष्ठा यामुळे दक्षिणची जनता आमदार ऋतुराज पाटील यांना निश्चितपणे विजयी करेल. माजिक कार्यकर्ते उत्तम भोसले यांनी शारदा विहार सोसायटीच्यावतीने आमदार ऋतुराज पाटील यांना पाठींबा जाहीर केला.

यावेळी माजी नगरसेवक सतीश लोळगे, राजू परुळेकर, विकास जाधव, बंटी मांगुरे, शैलेश जाधव, अवधूत कुलकर्णी, संजय कुलकर्णी संजय पोळ, राजेश व्हटकर, जालंदर हांडे, गजानन गोंगाने, सुजय पाटील, मुस्ताक मुजावर, योगेश पाटील, गुरुनाथ नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article