Solapur News : सोलापुरातील ओसाड पडलेला स्ट्रीट बझार आता 'बहरणार'
सोलापूर स्ट्रीट बझार लिलावाला भरघोस प्रतिसाद
सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानलगत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या स्ट्रीट बझार येथून अखेर महापालिका प्रशासनाला दुकानांच्या माध्यमातून महिन्याकाठी एक लाख आणि वर्षाकाठी १२ लाख रुपयांचे भाडे मिळणार आहे. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ओसाड पडलेला स्ट्रीट बझार लवकरच बहरणार आहे. याच पध्दतीने अन्य बंद पडलेल्या किंवा रखडलेल्या प्रकल्पातून मनपाला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा सोलापूरकरांना आहे.
गेली अनेक वर्षे स्ट्रीट बझारचा परिसर विना महसूल पहून होता. मात्र स्मार्ट सिटी योजनेतून श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच शहरातील अन्य भागांमध्ये देखील कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेला भविष्यात मोठे उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे, यासाठी विविध प्रकल्प उभारण्यात आले. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही अनेक प्रकल्प धूळखात पडले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीतील उर्वरित प्रकल्पातून उत्पन्नाचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला होता. आता काहीतरी तडजोड करून त्याद्वारेही उत्पन्न मिळू शकते हे मनपा आयुक्तांनी मनपा अधिकार्यांना दाखवून दिले आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले हे बझार त्याचवेळी महसूल मिळण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. यानंतर मात्र महापालिका प्रशासनाने येथील दहा बान दहाची तात्पुरती दुकान जागा तया करून त्याचा लिलाव केला होता. त्यावेळ मात्र महापालिकेच्या मिनी गाळ्याच्य तुलनेत या दुकानांसाठीचे भाडे अधिव प्रमाणात ठेवण्यात आले होते. यामुळ म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.. काहीजणांनी मोठमोठ्या रकमांच्या लिलावाद्वारे ही जागा घेतली तर होती, पण नंतर ही जास्त असल्याचे वाटल्याने या लिलावाची प्रक्रिया घेतलेल्या दुकानदारांनी पूर्ण करून घेतली नव्हती. तर काही जणांनी भरलेली अनामत रक्कम पुन्हा काढून घेतली होती.
या प्रकारामुळेच महापालिका आयुक्त - डॉ. सचिन ओम्बासे यांनी या स्ट्रीट - बझारमधील प्रत्येक दुकान जागेसाठी १५०० रुपये भाडे ठरवून त्याच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ४५ दुकान जागांचा लिलाव झाला. एका दुकानासाठी १ हजार ८०० रुपयांपासून ते सर्वाधिक ४ हजार ५०० रुपयांपर्यंतचे भाडे निश्चित झाले. यामुळे महापालिकेला गेल्या चार वर्षापासून कोट्यवधी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या 'स्ट्रीट बझार' च्या माध्यमातून महसूल म्हणून दरमहा सुमारे १ लाख ५ हजार रुपये असे वार्षिक १२लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. प्रत्येक दुकानदाराला दरमहा या रकमेवर १८ टक्के जीएसटी द्यावी लागणार आहे. आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पुढाकार घेत ज्याप्रमाणे स्ट्रीट बाजार संदर्भात व्यवहार्य मार्ग काढला तसा अन्य प्रकल्पांबाबतही काढल्यास महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल.