महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुळगा (ये.) रस्त्याची दयनीय अवस्था

10:36 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धामणे : सुळगा (ये.) रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होवून आता सुरू असलेल्या पावसाचे पाणी या सर्व खड्ड्यांतून भरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांना धोका निर्माण झाला आहे. येळ्ळूर ते देसूर, नंदिहळ्ळी रस्त्याला जोडणारा सुळगा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खराब झाला आहे. परंतु आता सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जास्त प्रमाणात खराब झाल्याने रस्त्याने ये-जा करणे वाहनचालकांना वाहन चालवतेवेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यामध्ये पाणी साचल्यान दुचाकी व चारचाकी वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठा घोळ होत आहे. गाडी नादुरुस्त झाल्यानंतर खड्ड्यांतून गाडी ढकलत न्यायचे म्हणजे वरून पावसाचा जोर. त्यामुळे वाहनधारकांची गोची होत आहे.

Advertisement

या सुळगा रस्त्याने राजहंसगडावर जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढली असून देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, गर्लगुंजी या भागातून येणारी वाहने सुळगा रस्त्याने येळ्ळूरमार्गे शहराकडे मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. हा रस्ता अतोनात खराब झाल्यामुळे या भागातील सर्व वाहनधारकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. या भागाचे लोकप्रतिनिधीनी या रस्त्याच्या समस्येकडे तातडीने जातीने लक्ष घालून हा रस्ता सुरळीत करून या भागातील वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील वाहनधारकांकडून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article