For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसगावातील पाडलेले घर आगरवाडेकरांचेच

11:16 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसगावातील पाडलेले घर आगरवाडेकरांचेच
Advertisement

आसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांची माहिती : आगरवाडेकरांच्या घरावरुन ग्रामसभेत गदारोळ

Advertisement

म्हापसा : आसगाव येथे बेकायदेशीरपणे पाडण्यात आलेल्या प्रदीप आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा मालकीहक्क नेमका कुणाकडे आहे, या प्रश्नावरून काल रविवारी आसगाव ग्रामसभेत बराच गदारोळ माजला. अनेकांनी यावर सविस्तर चर्चा करण्याचे आवाहन केले, परंतु हा मुद्दा ग्रामसभेच्या अजेंड्यात नसल्याने त्यावर चर्चा करणे पंचायत मंडळाने टाळले. मात्र सध्याचे घर जमिनीचे मूळ मालक डायस यांच्याकडून नंतर ख्रिस पिंटो आणि त्यानंतर आता कायद्याने आगरवाडेकर यांच्याच मालकीचे असल्याचे सरपंच हनुमंत नाईक यांनी स्पष्ट केले. गोवा भर गाजलेल्या आगरवडेकर घर मोडतोड प्रकरण, गावात येणाऱ्या नवीन नाईट क्लब या प्रश्नावरून ही ग्रामसभा बरीच गाजली. आसगाव पंचायत क्षेत्रात यापुढे पंचायत मंडळ व ग्रामस्थ यांना बरोबरीने घेऊन नवीन हॉटेल्स तसेच मोठ्या प्रकल्पांना बांधकाम परवाने देतेवेळी गावचे हित ध्यानात घेऊनच निर्णय घेतले जाणार असल्याचे ठोस आश्वासन सरपंचाने दिले. यावेळी उपसरपंच सोनिया नाईक, पंचसदस्य राघोबा कांबळी, सचिन गोवेकर, वॉल्टर ब्रिटो, तनया गांवकर, सौ. आश्विनी पोखरे तसेच पंचायत सचिव राजेश आसोलकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

 बेकायदेशीरपणावर कारवाई करणार 

Advertisement

परप्रांतीय धनाढ्या लोकांकडून गावांत बेकायदा उभारण्यात येत असलेले नाईट क्लब, हॉटेल लॉबीकडून कायद्याचे उल्लंघन करीत भर रस्त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी, त्यामुळे गावभर पसरलेली दुर्गंधी आणि रोगराई आणि सध्या गोवाभर गाजत असलेले आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडल्याचे प्रकरण आदी प्रश्नावरून  ग्रामसभेत बराच गदारोळ झाला. रविवारी सकाळी सुऊ झालेली ग्रामसभा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आटोपती घ्यावी लागली.

 रुम्बा नाईट क्लबवरुन गदारोळ

रुम्बा नाईट कल्बला दिलेला परवाना बार अँड रेस्टॉरंटचा होता, नाईट कल्बसाठी दिला नव्हता, हे स्पष्ट होताच समोर येताच सरपंचानी तो परवाना मागे घेण्यात आल्याची माहिती दिली.  ऊम्बा नाईट कल्बची येत्या एक दोन दिवसांत स्थानिक आमदार डिलायला लोबो यांच्या उपस्थितीत पंचायत मंडळ पुन्हा पाहाणी करून अहवाल तयार करणार असून याकामात आसगांव-बादें नागरिक कृती समितीची मदत घेण्यात येणार आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी सुरेंद्र गाड यांनी उपस्थितांना ऊम्बा नाईट क्लबची माहिती दिली. ग्रामस्थ चंदन मांद्रेकर, आईन्स्टाईन बार्रेटो, सुरेंद्र गाड, शिवाजी सावंत, मनोज सावंत, अविनाश फोन्सेका आदींनी सभेत भाग घेतला. आसगाव भागातील रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले असून ये जा करतेवेळी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. येथे अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्याची त्वरित डागडूजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. येथील हॉटेलमालकांकडून हे रस्ते दुरुस्त करुन घ्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यातप आली.

Advertisement
Tags :

.