कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगातील सर्वात खोल भाग

06:24 AM Aug 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

या ठिकाणापर्यंत पोहोचणे नाही सोपे

Advertisement

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, परंतु पृथ्वीचा सर्वात खोल भाग कोणता याचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का? हे ठिकाण मृत समुद्राच्या किनाऱ्यावर मध्यपूर्वेत आहे. येथे जमीन सागराच्या पातळीपेक्षाही सुमारे 1300 फूट खाली आहे. म्हणजेच तेथे उभे राहिल्यास तुम्ही समुद्राच्या पातळीच्या खाली असाल, तरीही पाण्यात नसाल तर कोरड्या जमिनीवर असाल. याला पृथ्वीवरील सर्वात लोयेस्ट ड्रायलँड म्हटले जाते. मृत समुद्र सर्वात लोयेस्ट पॉइंट असला तरीही पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण मरीयाना ट्रेंच आहे जे समुद्रात आहे. तेथे एक पॉइंट आहे, ज्याला चॅलेंजर डीप म्हटले जाते, जे सुमारे 36 हजार फूट खोल आहे.

Advertisement

मृत समुद्र प्रत्यक्षात एक अत्यंत मोठे आणि अत्यंत खारट सरोवर आहे. याची लांबी सुमारे 76 किलोमीटर आणि रुंदी 18 किलोमीटरपर्यंत आहे. याचे नाव मृत समुद्र पडले कारण यात मिठाचे प्रमाण इतके अधिक आहे की यात कुठलाही मासा किंवा जीव जिवंत राहू शकत नाही. मृत समुद्र अशा ठिकाणी आहे, जेथे पृथ्वीच्या दोन मोठ्या टेक्टोनिक प्लेट्स आफ्रिका आणि अरब परस्परांना धडकत आहेत. हा भाग सुमारे 1 हजार किलोमीटर लांब असून येथील तडा सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, असे मानले जाते. प्लेट्सच्या या हालचालींमुळे या भाग इतका खचला आहे. येथील जमीन अत्यंत हळूहळू, दरवर्षी काही मिलीमीटर सरकत असते. याच हालचालींमुळे येथील भाग खचत केला आहे.  जर प्लेट्स सरळ असत्या तर जमीन खचली नसती, असे काही वैज्ञानिकांचे मानणे आहे, परंतु येथील भेगेला काहीसे वळणही आहे जेव्हा प्लेट्स तेथून जातात, तेव्हा त्यादरम्यान एक रिकामी जागा तयार होते, त्यातच जमीन हळूहळू खचत केली आणि मृत समुद्राची खोली तयार झाल्याचे मानले जाते. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीखालील एक मोठा हिस्सा वेगळा झाल्याने हा भाग खोल झाल्याची देखील एक थेअरी आहे. उर्वरित भाग तसाच राहिला, परंतु मधला हिस्सा बुडत गेल्याची ही थेअरी आहे.

संशोधन अद्याप जारी

या सर्व गोष्टी वैज्ञानिकांच्या अध्ययनावर आधारित आहेत, परंतु सत्य जाणणे इतके सोपे नाही. कारण या सर्व प्रक्रिया अत्यंत मंदगतीने होत असतात. त्याचे स्वरुप जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागु शकतो आणि मोठा खर्च येऊ शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article