For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात खोल गुहा

06:40 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात खोल गुहा
Advertisement

गुहेत डोकावताच अंगावर येतो काटा

Advertisement

जगात अशा अनेक अजब जागा आहेत, ज्या रोमांचाने भरलेल्या आहेत, परंतु तेथे जोखिम देखील कमी नसते. अशीच एक जागा आहे वेरीओवकिना गुहा. ही जगातील सर्वात खोल ज्ञात गुहा असुन याची खोली अत्यंत अधिक असल्याने यात उतरण्याचे साहस कुणीच दाखवू शकत नाही. या गुहेकडे पाहिल्यास जणू हा मार्ग ‘पाताळलोक’च्या दिशेने जात असल्याचे वाटते, याचमुळे या गुहेत केवळ डोकावले तरीही लोकांच्या अंगावर काटा येतो.

वेरिओवकिना गुहेची खोली 2,212 मीटर आहे. ही गुहा अब्खाजियामध्ये अरेबिया मासिफमध्ये आहे. हे जॉर्जियाचे एक वेगळे क्षेत्र आहे. गुहेच्या वर्तमान खोलीपर्यंत प्रवास करणे आणि पुन्हा पृष्ठभागावर येण्यास किमान एक आठवडा लागतो.

Advertisement

ही गुहा चुनादगडाद्वारे तयार झाली असून याचा 1968 मध्ये पहिल्यांदा शोध लागला होता. परंतु तेव्हा या गुहेचे अनेक हिस्से अज्ञात होते. 1982 मध्ये मॉस्कोच्या स्पेलोलॉजी क्लबने याच्या अनेक हिस्स्यांचा शोध लावला होता. वेरीओवकिना किंवा वेरेवकिना गुहेचे नाव एक गुहा संशोधक अलेक्झेंडर वेरेवकिना यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. अलेक्झेंडर यांचा मृत्यू 1983 मध्ये झाला होता.

मार्च 2018 पूर्वी जगातील सर्वात खोल गुहा असण्याचा मान व्रुबेरा गुहेच्या नावावर होता, याला वोरोन्या गुहा या नावाने देखील ओळखले जाते. याची खोली 7,215 फूट आहे. ही गुहा जॉर्जियामध्येच अब्खाजियाच्या गागरा जिल्ह्यात आहे.

गुहेत उतरणे नाही सोपे

वेरीओवकिना गुहेत उतरणे सोपे नाही. अत्यंत साहसी आणि दृढनिश्चयी लोकच या गुहेत उतरत असतात. या गुहेत उतरण्यासाठी अत्यंत अवघड मार्ग आहे. ही गुहा अत्यंत प्रसिद्ध असल्याने ती पाहण्यासाठी दूर दूरवरून लोक येत असतात. परंतु या गुहेत फारच कमी लोक उतरण्यास यशस्वी ठरतात. पण गुहेचे सौंदर्य लोकांना स्वत:कडे आकर्षित करत असते.

Advertisement
Tags :

.