महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळंगूटमध्ये आढळला ‘दिवोदिता’चा मृतदेह

10:44 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खुनाचा संशय, कंत्राटदार ‘नॉट रिचेबल’ : दिवोदिताचा मोबाईल, कर्णफुले गायब

Advertisement

म्हापसा : नाईकवाडा-कळंगूट येथील मार्केटमध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये दिवोदिता फर्नांडिस (वय 64) या वृद्धेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. हा प्रकार खुनाचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून शवचिकित्सा अहवालातून ते स्पष्ट होईल. बेनसन ई या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे. मूळ पेडे म्हापसा येथील फर्नाडिस आपल्या नातेवाईकांच्या कळंगूट येथे असलेल्या फ्लॅटच्या कामाचे नूतनीकरण पाहणीसाठी गुऊवारी सकाळी गेल्या होत्या. पण त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने म्हापशातील त्या महिलेच्या केअरटेकर महिलेने चौकशी करण्यासाठी दिवोदिता यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

मात्र त्या फोन उचलत नव्हत्या. नंतर त्यांनी कळंगूट येथील फ्लॅटच्या शेजारी राहणाऱ्यांशी संपर्क केला. शेजाऱ्यांना त्या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे दुसरी चावी वापरून दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडताच त्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दिवोदिता यांच्या गळ्यावर काही खुणा आढळून आल्या असून त्यांच्या तोंडातून रक्त आल्याचे आढळून आले आहे. तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत माहिती मिळताच कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक व व किरण नाईक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह गोमॅकोत पाठविला आहे.  पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले असून पुढील तपास सुरू आहे. दिवोदिताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कानातील कर्णफुले, भ्रमणध्वनी, पर्स गायब झाल्याचे आढळून आले असून याठिकाणी ज्या कंत्राटदाराने पेंटिंग काम हाती घेतले होते त्याचा भ्रमणध्वनी बंद मिळत आहे. काल शुक्रवारी रात्री उशिरा कळंगूट पोलिसांनी दोघा संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article