महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी खुर्द येथे दौडला उत्साहात प्रारंभ

10:32 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी खुर्द येथे घटस्थापनेपासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व व मोठ्या उत्साहात प्रारंभ केला असून पहिल्याच दिवशी 500 पेक्षा अधिक धारकऱ्यांनी सहभाग दर्शविला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिवमूर्तीचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षासह इतर सदस्यांनी केले. यानंतर आरती, शाही घोषणा, श्लोक, मंत्र व स्फूर्तीगीत गायन झाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, दुर्गामाता हिंदुधर्म व देशाचा जयजयकार करणाऱ्या घोषणा देत ऐतिहासिक स्फूर्तीगीते गात गावात दौड काढली. यानिमित्त घरासमोर आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका, भगवे झेंडे लावल्याने गाव भगवेमय झाले आहे. दौडमध्ये सहभागी नागरिकांनीही दौडला साजेशी वेशभूषा केल्याचे दिसून आले. मारुती मंदिरासमोर मानाने ध्वज उतरवून दौडची सांगता करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article