For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडी रस्त्यावरील ‘तो’ धोकादायक खड्डा बुजविला

10:57 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडी रस्त्यावरील ‘तो’ धोकादायक खड्डा बुजविला
Advertisement

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार

Advertisement

वार्ताहर/किणये 

खादरवाडी गावच्या मुख्य रस्त्यावर नाल्याच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले होते. यामुळे अनेक किरकोळ अपघातही घडलेले आहेत. अखेर गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन खड्ड्याची दुरुस्ती केली आहे. मुख्य रस्त्यावरच खड्डा असल्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या खड्ड्याच्या रस्त्याला नागरिक अक्षरश: वैतागून गेले होते. खादरवाडी गावातील बहुतांशी तरुण उद्यमबाग व अन्य ठिकाणी कामाला जातात. रात्रीच्या वेळी घरी येत असताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक कामगार खड्ड्याच्या ठिकाणी दुचाकीवरून पडून किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पिरनवाडी नगरपंचायतीचे गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे गावचा विकास खुंटला आहे अशा तक्रारी नागरिक व्यक्त करत आहेत. खादरवाडी रस्त्यावरील खड्डा बुजविण्यासाठी संतोष गणपत पाटील व रमेश गणपत पाटील या दोन्ही भावंडांनी वाळू व काँक्रीटसाठी लागणारे सर्व साहित्य स्वखर्चाने दिले. राकेश पाटील, राजेश पाटील, विशाल पाटील, आकाश पाटील, फोंडू देसाई, अऊण माळवी, अनिल बिर्जे, शाम पाटील, मयूर पाटील, गंगाधर कडलीकर, प्रल्हाद कामती, राहुल पाटील आदींनी परिश्र्रम घेतले. या कार्यकर्त्यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून रस्त्यावरील खड्डा बुजवण्याचे कार्य केले. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.