आफ्रिकेत हूती दहशतवाद्यांचा धोकादायक विस्तार
आफ्रिकेला दहशतवाद्यांसाठी नंदनवन करण्याचा डाव : जागतिक सागरी व्यापाराला बसणार फटका
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इराक स्वत:च्या भूमीवर हूती दहशतवाद्यांची उपस्थिती रोखण्याचा प्रयत्न करत आहे. हूती दहशतवाद्यांना इराणचे समर्थनप्राप्त असून इराण अनेक वर्षांपासून शस्त्रास्त्रs अन् निधी पुरवत आला आहे. हूती बंडखोर उत्तर-पश्चिम येमेनला नियंत्रित करतात आणि इराण त्याच्या माध्यमातून भूराजकीय लाभ मिळवत असतो. एकीकडे इराक हूतींपासून देशाला मुक्त करण्यासाठी पावले उचलत आहे, तर दुसरीकडे हूती दहशतवदी आफ्रिकेत स्वत:चा विस्तार करत आहेत.
हूती दहशतवाद्यांचा विस्तार धोकादायक आणि अनपेक्षित असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये हूती दहशतवाद्यांनी हॉर्न ऑफ आफ्रिकेत वेगाने स्वत:ची उपस्थिती वाढविली आहे. यामुळे क्षेत्रीय स्थिरता आणि जागतिक सागरी मार्गांच्या सुरक्षेवर गंभीर प्रभाव पडत आहे. हा विस्तार मुख्यत्वे सोमालियाच्या अल-शबाब आणि अन्य दहशतवादी समुहांसोबत आघाडी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि स्थानिक लोकसंख्येत होणाऱ्या भरतीद्वारे होत आहे.
हॉर्न ऑफ आफ्रिकेत वाढता प्रभाव
आफ्रिकेचा हॉर्न येमेनच्या पार एडनच्या उपसागराच्या दुसऱ्या बाजूला आहे आणि लाल समुद्राच्या किनाऱ्यासोबत फैलावलेला आहे सागरी व्यापारी मार्गांवर यामुळे हूतींना महत्त्वपूर्ण लाभ प्रदान होतो आणि गाझामध्ये हमासच्या सहाय्यासाठी नवे मार्ग खुले करु शकतो. याच्या माध्यमातून हूती बंडखोर भौगोलिक स्वरुपात इस्रायलच्या आणखी नजीक येऊ शकतील आणि प्रमुख सागरी चोक पॉइंट्सवर त्यांची पकड आणखी मजबूत होऊ शकते. सोमालियात कट्टरवादी समुहांसाब्sात हूतींची आघाडी झाली असून यात सुन्नी दहशतवादी समूह अल-शबाब, अल-कायदाशी संबंध बाळगणारी संघटना आणि आयएसआयएसचे घटक देखील सामील आहेत.
जागतिक व्यापारासाठी चिंतेचा विषय
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या अहवालानुसार अल-शबाबच्या म्होरक्यांनी सोमालियात हूती दहशतवाद्यांसोबत गाठीभेटी केल्या असून यात शस्त्रास्त्र आणि प्रशिक्षणाची विनंती करण्यात आली आहे. याच्या बदल्यात अल-शबाबने सोमालियाच्या किनाऱ्यावर आणि एडनच्या उपसागरात सागरी चाच्यांचे हल्ले वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. याचबरोबर या क्षेत्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जाईल आणि व्यापाराचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जहाजांचे अपहरण करणे आणि मग खंडणीची मागणी करण्याचाही प्लॅन आखण्यात आला आहे. हूतींनी जिबूती, सोमालिया, इरिट्रिया आणि इथियोपिया यासारख्या देशांमध्ये स्वत:ची उपस्थिती स्थापित केली आहे. हे क्षेत्र एडनचे आखात आणि लाल समुद्राच्या नजीक असून ते महत्त्वपूर्ण सागरी मार्गांना नियंत्रित करते. यामुळे हूतींचा हा विस्तार जागतिक व्यापार आणि क्षेत्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
लाल समुद्रातील कारवाया वाढणार
गरीब मुस्लीम लोकसंख्येतून लोकांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती केली जात आहे. हूती संघटना लाल समुद्रातील कारवायांसाठी दहशतवादी विभाग स्थापन करत असून याकरता आफ्रिकन युवांची भरती केली जात आहे. हूतींनी अफार समुदायाच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येमेनमध्ये बोलाविले आणि त्यांना धार्मिक कट्टरवादी विचारसरणीने प्रभावित केले हेते. याचबरोबर हूतींनी त्यांना स्वत:च्या समुदायामध्ये आणखी लोकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
दहशतवादाच्या या स्वरुपामागे इराण
हूतींचा हा विस्तार इराणच्या समर्थनाने होत असून याद्वारे आफ्रिकेत इराणचा प्रभाव वाढत आहे. या घडामोडी केवळ क्षेत्रीय अस्थिरतेसाठी धोक्याच्या नसून जागतिक सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी देखील चिंतेचा विषय आहेत. हूतींच्या हालचालींमुळे लाल समुद्र आणि एडनच्या उपसागरात सागरी वाहतूक प्रभावित होऊ शकते, यामुळे जागतिक व्यापारावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. हूतींचा आफ्रिकेत विस्तार आणि स्थानिक दहशतवादी संघटनांसोबत भागीदारीमुळे क्षेत्रीय स्थिरता धोक्यात आली आहे. इराणच्या समर्थनाने हूतींनी स्वत:च्या सैन्य क्षमतेत वाढ केली असून आफ्रिकेत स्वत:च्या प्रभावाचा विस्तार केला आहे.