राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा पडदा उद्या उघडणार
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून वेळापत्रक जाहीर
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 63 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्या स्पर्धेचा पडदा सोमवारी, 25 रोजी उघडणार आहे. सायंकाळी 7 वाजता शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून कोल्हापुरातील सुगुण नाट्याकला संस्थेच्यावतीने प्रा. वसंत कानेटकर लिखीत सुनील घोरपडे दिग्दर्शित ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे, तरी जास्तीत जास्त नाट्याप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 63 वी राज्य हौशी मराठी नाट्या स्पर्धेत 19 नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान नाट्या स्पर्धा सुरू राहणार आहे. 26 रोजी कृष्णाजी खाडीलकर लिखीत डॉ. संजय तोडकर दिग्दर्शित ‘भाऊबंदकी’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
28 रोजी शरद घाग लिखीत मिलिंद चिकोडीकर दिग्दर्शित ‘फुलला सुगंध मातीचा’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 29 रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखीत डॉ. प्रमोद कसबे दिग्दर्शित ‘मोक्षदाह’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 30 रोजी नलिनी सुखथनकर लिखीत प्रसन्न कुलकर्णी दिग्दर्शित ‘पद्मश्री धुंडिराज’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
1 डिसेंबर रोजी हेनरिक इब्सेन लिखीत ज्ञानेश मुळे दिग्दर्शित ‘अॅन एनिमी ऑफ द पीपल’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 2 रोजी दिलीप जगताप लिखीत निलेश आवटे दिग्दर्शित ‘प्रश्नचिन्ह’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 3 रोजी जयसिंग पाटील लिखीत शिवाजी पाटील दिग्दर्शित ‘आणि कुंभाराच काय झाल?’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 4 रोजी डॉ. श्रध्दानंद ठाकूर लिखीत व दिग्दर्शित ‘वॉक इन’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 5 रोजी विष्णू सूर्या वाघ लिखीत देविदास शंकर आमोणकर दिग्दर्शित ‘बाई मी दगूड फोडते’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 6 रोजी संकेत तांडेल लिखीत शिरीष यादव दिग्दर्शित ‘चल थोंड अॅडजेस्ट करू’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 7 रोजी राजन खान लिखीत प्रकाश रावळ दिग्दर्शित ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 9 रोजी विद्यासागर अध्यापक लिखित लिखीत मुरलीधर बारापात्रे दिग्दर्शित ‘साखर खाल्लेला माणूस’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 10 रोजी अरूण नाईक लिखीत रविदर्शन कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोंडमारा’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 11 रोजी अनंत कांबळे मांडुकलीकर लिखीत व दिग्दर्शित ‘गांधीनितीचे 21 दिवस’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 12 रोजी ऋषीकेश तुराई लिखीत अनुपम दाभाडे दिग्दर्शित ‘म्याडम’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 13 रोजी कौस्तुभ नाईक लिखीत सतीश तांदळे दिग्दर्शित ‘संगीत मतिविलय’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 14 रोजी प्रसन्न कुलकर्णी लिखीत व दिग्दर्शित ‘टेक इट लाइटली’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 15 डिसेंबर रोजी जितेंद्र देशपांडे लिखित लिखीत व दिग्दर्शित ‘श्वेतवर्णी शामकर्णी’ नाटकाच्या सादरीकरणानंतर नाट्या स्पर्धेची सांगता होणार आहे.