आदमापूरात वर्चस्ववादातून तरुणावर गोळीबार
कोल्हापूर :
आदमापूर (ता. भुदरगड) येथे श्रीकांत तानाजी मोहिते (वय 32, रा. समता कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याला ठार मारण्यासाठी कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगाराच्या गँगने गोळीबार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी ऊग्णालयात दाखल केले.
गोळीबाराची घटना शनिवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जिह्यातील औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप व्यावसायातील वर्चस्व वादातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गारगोटी पोलीस ठाण्यात गँग प्रमुख गुन्हेगार अविनाश कोळीसह तेरा जणाविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये गँग प्रमुख अविनाश कोळी, भाऊ अभिजीत कोळी, शार्पशुटर श्रीकांत मोहिते, अभय उर्फ अभि काळोखे, वैभव साठे, ऋषिकेश उर्फ प्रताप भोरे, कार्तिक राजूरकर, जॉय भालेराव, अली बालेचाँद तानेखान, रोहित आनंदा कांबळे (सर्व रा. पुलाची शिरोली) यांचा समावेश आहे. गोळीबाराचा प्रकार विधानसभेच्या मतमोजणी दिवशी सकाळी झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांभीर्याने दखल घेतली. या गुह्यातील संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिला. त्या आदेशावऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयिताचा तत्काळ शोध सुऊ केला. काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पण तपासाच्या नावाखाली त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील स्क्रॅप व्यावसायातील कोळी आणि लाड या दोन गटात गेल्या काही वर्षापासून वर्चस्व वादातून वाद सुरू आहे. या वादाला गांजा प्रकरणी शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेला गुन्हेगार अविनाश कोळीच्या स्क्रॅप व्यवसायातील प्रवेशानंतर अधिक स्पर्धा निर्माण झाली. यादरम्यान लाड गटाचा प्रमुख विनायक लाडने प्रतिस्पर्धी अविनाश कोळीच्या सप्लायरना कमी दराने स्क्रॅप विक्री करू लागल्याने, त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला. याचवेळी कल्पेश कुंभार (रा. घुडेवाडी ता. राधानगरी) हा लाडकडून स्क्रॅप विकत घेऊ लागला. या विक्रीतून लाड यांची 5 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात 15 मे 2024 रोजी रचना अॅग्रो सर्व्हिसेसचे कल्पेश बाळासो कुंभार व पीपी ट्रेडर्सचे पांडूरंग मारुती कुंभार (दोघे रा. घुडेवाडी) यांच्या विरोधी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या फसवणुकीमागे गुन्हेगार अविनाश कोळी असल्याची लाडची खात्री झाल्याने, त्याच्यात वाद सुऊ झाला. या वादातूनच दोन दिवसांपूर्वी नागाव (ता. हातकणंगले) येथील डॉ. आंबेडकर नगरमध्ये लाड याच्यावर हल्ला कऊन जखमी करण्यात आले. याबाबत शुक्रवारी दुपारी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यानंतर शनिवारी मध्यरात्री लाड यांच्या गटातील तऊणांनी विरोधी गटाचा प्रमुख कोळीच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी त्यांच्या दारातील फॉर्च्युनर व महिंद्रा थार य्गाड्यांची मोडतोड करीत, दहशत निर्माण केली. या प्रकाराची पोलिसात लाड टोळीचा प्रमुख विनायक लाड, अनिकेत लाड, अनिल उर्फ जॅकी माने व अनोळखी चौघे अशा सात जणाविरोधी गुन्हा दाखल झाला.
किंमती गाड्याच्या तोडफोडीनंतर कोळी गँगचा प्रमुख कोळीने प्रतिस्पर्धी गँगचा प्रमुख विनायक लाडचा गेम करायचा. यासाठी त्यांचा शोध सुऊ केला. यादरम्यान त्याला तो आदमापूर (ता. भुदरगड) येथील हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. त्यावऊन गुन्हेगार कोळीने भाऊ अभिजीत कोळी, शार्पशुटर श्रीकांत मोहिते, अभय उर्फ अभि काळोखे, वैभव साठे, ऋषिकेश उर्फ प्रताप भोरे, कार्तिक राजूरकर, जॉय भालेराव, अली बालेचाँद तानेखान, रोहित कांबळे यांना घेऊन लाड थांबलेल्या हॉटेलकडे शनिवारी पहाटे धाव घेतली. लाड हॉटेल बाहेर येताच शार्पशुटर मोहितेने त्यांच्या दिशेने पिस्टलमधून गोळ्या झाडल्या. तो खाली वाकल्याने एक गोळी हवेत केली. तर तो वाकल्याचे पाहून त्यांच्यावर दुसरी गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर कोसळला. त्यांनतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर एडक्याने हल्ला केला. तो बेशुध्द पडल्याने तो ठार झाला म्हणून हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पलायन केले. त्यानंतर जखमी लाडला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी शहरातील खासगी ऊग्णालयात हलवण्यात आले.