बेळगाव शुगर्सच्या गळीत हंगामाला प्रारंभ
12:51 PM Nov 11, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव शुगर्स प्रा. लि. हुदली कारखान्याने 2025-26 सालाच्या गळीत हंगामाला सोमवारपासून प्रारंभ केला. संचालक व युवा नेते राहुल जारकीहोळी व कारखान्याचे अध्यक्ष प्रदीपकुमार इंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामाला चालना दिली. यावेळी इंडी म्हणाले, 2025-26 हंगामासाठी सरकारने निश्चित केलेल्या ऊस दराप्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली जातील. शेतकऱ्यांनी चालू हंगामात कारखान्याला उच्च दर्जाचा ऊस पुरवठा करून कारखान्याच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बागण्णा नरोटी, शिवकुमार गुडगेनट्टी, मल्लनगौडा पाटील, समर्थ पाटील, उपाध्यक्ष एल. आर. कारगी, पी. डी. हिरेमठ, उपाध्यक्ष डी. आर. पवार, ए. एस. राणा, व्ही. एम. तळवार यांच्यासह अधिकारी, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article