For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयोगाची वक्रदृष्टी!

06:00 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयोगाची वक्रदृष्टी
Advertisement

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निवडणुका कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत पार पाडण्याची जबाबदारी ही ज्याप्रकारे पोलीस यंत्रणेवर असते. अगदी त्याप्रकारे ती निवडणूक आयोगावरदेखील असते. यादरम्यानच्या काळात आचारसंहितेचे पालन तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे कुठे उल्लंघन तर होत नाही ना? यासाठी निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारावर वक्रदृष्टी ठेवली आहे.

Advertisement

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचारसभेसाठी गेले असता या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांच्या

बॅगेची झडती घेतली. तसेच हेलिकॉप्टरची देखील झडती घेतली. निवडणूक काळात मतदारांना भुलविण्यासाठी काही बाबी तर उद्धव ठाकरे यांनी जवळ बाळगल्या नाहीत ना? याची खातरजमा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केली. मात्र निवडणूक आयोगाच्या या खमक्या भूमिकेमुळे त्यांच्यावर तसेच महायुतीवर खापर फोडण्यास सुऊवात झाली आहे. कारण हे निवडणूक आयोगाचे जाणून-बुजुन केलेले षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement

एखाद्या पक्षाच्या पक्षप्रमुखांची अशाप्रकारे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने झडती घेण्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्षपातीपणा नसून त्या निष्पक्षपातीपणे पार पडाव्यात यासाठी ही घेतलेली झडती असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. यामध्ये कोणीही असो निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जावेच लागेल असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. देशातील प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक निष्पक्षपातीपणे पार पडावी यासाठी निवडणूक आयोग अहोरात्र झटत असतो. पोलिस दलाबरोबरच निवडणूक आयोगाची भरारी पथकेदेखील निवडणुकीच्या काळात चोवीस तास डोळ्यात तेल घालुन पवित्र अशा आचारसंहितेचे उल्लंघन तर होत नाही ना? याकडे लक्ष देत असतो. जो उमेदवार किंवा राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमांचे अथवा आचारसंहितेचे उल्लंघन करेल, त्यावेळी उमेदवाराची उमेदवारीदेखील धोक्यात येते. यामुळे निवडणूक आयोगाने जी आचारसंहिता तयार केली आहे. त्याचे तंतोतंत पालन करणे प्रत्येक पक्ष आणि राजकीय नेत्यांची प्रमुख जबाबदारी असते. तसेच या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाची राजकीय पक्ष तसेच उमेदवारासह अनेक बाबींवर वक्रदृष्टी आहे.

निवडणुकांचे वारे एकदा का वाहण्यास सुऊवात झाली की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक भूलथापा, आश्वासने तसेच वस्तू किंवा पैशांची खैरात केली जाते. निवडणुकादरम्यान अशा अवैधरित्या सुऊ असलेल्या कृत्याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. या नियमांचे उल्लंघन म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाते. मात्र प्रत्येक निवडणुकीत सर्रासपणे आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते. अशावेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली की, त्यातील साक्षीदार, पुरावे आदी तपासण्याचे काम निवडणूक आयोग करीत असते. याकरीता देशातील कितीही मोठा राजकीय पक्ष असो अथवा नेता  त्याच्या गळ्याभोवती फास आवळण्याचे काम निवडणूक आयोग करीत असतो. यामुळे अनेकदा राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता आणि निवडणूक आयोग यांच्यात वितुष्ट आल्याच्या घटना काही कमी नाहीत.

राज्यात एक काळ दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि निवडणूक आयुक्त नंदलाल यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून, मतदान प्रक्रीया सुऊ होण्यासाठी अवघे आठ दिवस बाकी आहेत. अशातच निवडणूक आयोगाकडे अक्षरश: तक्रारींचा खच पडला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर या निवडणुका पक्षपातीपणे होण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहीले होते. त्यानुसार, निवडणूक आयोगाने त्यांची बदली करीत निवडणुका होईपर्यंत रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. तसेच निवडणूक आयोगाने एकाच परिक्षेत्रात जास्त काळ कार्यरत असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करीत मोठा दणका दिला आहे. तर काँग्रेसने भाजपच्या जाहिरातीवर देखील आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त, महानगरप]िलका आयुक्त या सर्वांची बैठक घेत निवडणुका शांततेच्या मार्गाने कशा होतील याचा आढावा घेतला. तसेच या निवडणुकीदरम्यान महिलांचा सन्मान राखला जाईल, कोणीही आक्षेपार्ह विधान करणार नाही अशी तंबी निवडणूक आयोगाने दिली. तसेच प्रचारसभा आणि भाषण करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी तारतम्य बाळगण्याचे देखील आवाहन केले आहे. कारण यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्याची उदाहरणे ताजी आहेत.

आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तसेच देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक भरारी पथके तयार केली आहेत. या भरारी पथकांनी पोलिसांसह मिळून अनेक ठिकाणाहून काळी माया जप्त केली आहे. निवडणूक आयोगाचे नियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्यानंतर कोणत्या परिणामाला सामोरे जावे लागणार आहे, याची कल्पना राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आहे. मात्र सर्व काही जाणूनदेखील अशा प्रकारचे कृत्य म्हणजे, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तुडविण्यासारखे आहे. निवडणूक आयोगाने केलेले नियम आणि आचारसंहितेचे पालन म्हणजे राजकीय पक्षांसाठी असलेला जाच आणि गळ्याभोवती अडकलेला फास असल्याचे वाटत आहे. खुलेआम जरी निवडणूक आयोगाला कोणी आव्हान नाही दिले तरी नियम हे आमच्यासाठी नसतात, अशा अविर्भावात असलेले अनेकजण नियम मोडीत आहेत. यावेळी निवडणूक आयोग केवळ साक्षीदार, पुरावे, रेकॉर्डिंग हे सबळ पुरावे गोळा करण्यात गुंतले आहे. मात्र जर का उघडउघड कोणी निवडणूक आयोगाशी वैर घेतले, तर निवडणूक आयोग कशा प्रकारे मागे हात धुवुन लागतो, ते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी निवडणूक आयुक्त नंदलाल यांच्यात 2006 साली झालेल्या घमाशानवऊन आढळून येते.

यामुळे निवडणुका या शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता निवडणूक आयोग जे नियम आणि कायदे बनवित असतात त्याचे तंतोतंत पालन करणे प्रत्येक पक्ष आणि राजकीय नेत्याची जबाबदारी असते. अन्यथा निवडणूक आयोगाचा फास नक्कीच गळ्याभोवती आवळला जाणार हे मात्र नक्की.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.