महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मजगावच्या शेतकऱ्यांवर दुबार भातपेरणीचे संकट

08:04 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /मजगाव

Advertisement

मजगाव परिसरात उत्कृष्ट हंगाम मिळाल्यामुळे खरीप हंगामातील भातपेरणी केली होती. परंतु गेल्या चार दिवसापूर्वी मजगाव परिसराला पावसाने झोडपल्याने  भात उगवण्याअगोदरच कुजण्याच्या मार्गावर आहे. सतत पाऊस सुरू असल्याने भाताची उगवण व्हायच्या अगोदरच शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी किंवा रोप लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जर सलग पाऊस पडत राहिल्यास निम्याहून अधिक शेती पडीक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांना पावसाच्या पूर्ण उघडिपीची गरज आहे. किमान आठवडाभर उघडीप असेल तरच भात उगवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. तसे न झाल्यास मजगाव परिसरातील शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article