महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेदरलँड्समध्ये गुन्ह्यांचे प्रमाण शून्य

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तुरुंगात नाही एकही गुन्हेगार

Advertisement

न्यायालय कुणाला निर्दोष ठरविते, तर कुणाला मोठी शिक्षा ठोठावते, परंतु जगात एक असा देश आहे, जेथील तुरुंगांमध्ये एकही गुन्हेगार नाही, तेथील तुरुंगच रिकामी पडले आहेत. युरोपीय देशांमध्ये सामील नेदरलँड्समध्sय गुन्ह्यांचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये खूपच कमी झाले आहे. यामुळे येथील तुरुंग जवळपास पूर्णपणे रिकामी पडले आहेत. गुन्हेगारच नसल्याने तुरुंगात कोणाला डांबायचे असा प्रश्न तेथील प्रशासनासमोर आहे, परंतु या तुरुंगांमध्ये जेलर आणि उर्वरित सर्व कर्मचारी राहत आहेत.

Advertisement

नेदरलँड्समध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे, तर तुरुंग प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे कारण तुरुंग रिकामी पडले आहेत. परंतु सरकारकडून तुरुंगांच्या देखभालीसाठी पूर्ण व्यवस्था केली जात आहे. या देशात आता अनेक तुरुंगांना रेस्टॉरंटमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. तुरुंगांच्या आतच मोठमोठे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून तुरुंग प्रशासनच त्यांचे संचालन करत आहे.

याचबरोबर येथील प्रशासन तुरुंगांना भाडेतत्वावर देण्याचा विचार करत आहे. हे लोक विदेशातून गुन्हेगार मागवून त्यांना तुरुंगात डांबू पाहत आहेत, यातून काही प्रमाणात उत्पन्न प्राप्त होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. युरोपच्या आसपासच अनेक देशांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. नेदरलँडच्या तुरुंगांना भाडेतत्वावर मिळवुन संबंधित देश स्वत:ची समस्या सोडवू शकणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारने नॉर्वेसोबत काही वर्षांपूर्वी एक करार केला होता. नॉर्वेमधून येथे  गुन्हेगारांना पाठविले गेले होते.

इंटरनेटची सुविधा

याचबरोबर नेदरलँडचे तुरुंग अत्याधुनिक आहेत, येथील कैद्यांना रात्री इंटरनेट देखील पुरविण्यात येते, जेणेकरून ते स्वत:च्या मुलांना कहाण्या ऐकवू शकतील. नेदरलँडची गणना जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये होते. तर याची अर्थव्यवस्था जगात 15 व्या स्थानी आहे. येथील सरकार नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article