सर्वात तहानलेल्या रस्त्याची निर्मिती
इंजिनियर्सनी केली कमाल : क्षणार्धात पिऊन टाकतो पाणी
भारतात दरवर्षी रस्ते तयार केले जातात आणि वर्षाच्या आत ते तुटून जातात. कुठे ना कुठे रस्तेनिर्मितीचे काय सुरूच असते. भारतात सर्वात मोठी समस्या रस्त्यांच्या निर्मितीनंतर ते खराब होणे आहे. नवे रस्ते देखील खड्ड्यानी भरून जात असतात. यामागील कारण खराब सामग्रीचा वापर आणि भारतात प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम नसणे आहे. रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असते, यामुळे कमजोर झालेल्या रस्त्यांवर मोठे खड्ड् पडू लागतात.
या समस्येवर उपाय जर्मनीच्या इंजिनियर्सनी शोधला आहे. या तज्ञांनी अशाप्रकारचा रस्ता निर्माण केला आहे, जो अत्यंत तहानलेला आहे. हे रस्ते काही क्षणात अनेक गॅलन पाणी संपवित असतात. यामुळे या रस्त्यांवर पाणी साचत नाही आणि ते थेट अंडरग्राउंडमध्ये पोहोचते. रस्त्यांवर पाणी जमा होत नसल्याने अशाप्रकारचे रस्ते मजबुती कायम ठेवतात आणि दीर्घकाळापर्यंत टिकतात.
सोशल मीडियावर जर्मनीच्या इंजिनियर्सनी तयार केलेल्या रस्त्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा रस्ता क्षणात स्वत:वर पडलेले पाणी शोषून घेतो. यामुळे या रस्त्यावर पाणी साचत नाही आणि खड्ड्याची समस्याही दिसून येत नाही. हे पाणी थेट खाली जाते, प्रत्यक्षात हा रस्ता क्रश करण्यात आलेल्या ग्रॅनाइटने तयार केला जातो. यामुळे रस्ता अत्यंत स्मूथ असतो. तसेच पाणी थेट भूमिगत साठ्यात पोहोचत असल्याने जलपातळीही योग्य राहते.
भारतात राबविण्याची गरज
जर्मनीच्या इंजिनियर्सची ही कमाल सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाली आहे. भारतात लोक रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे त्रस्त असतात. भारतात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असते. ख•sयुक्त रस्त्यांमुळे दुर्घटना देखील होत असतात. अशास्थितीत भारतात देखील या तंत्रज्ञानाद्वारे रस्ते निर्माण करण्यात आल्यास दुर्घटनांचे प्रमाण कमी होईल. तसेच भूमिगत जलसाठाही वाढण्यास मदत होणार आहे