कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मत्स्य’च्या महत्त्वपूर्ण हिस्स्याची निर्मिती

07:00 AM Jul 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रोला मिळाले यश : समुद्रात 6000 मीटर खोलवर पोहोचणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

भारताने खोल समुद्रात उतरण्याच्या मोहिमेत एक मोठी झेप घेतली आहे. डीप ओशन मिशन अंतर्गत निर्माण करण्यात येणारी खास पाणबुडी ‘मत्स्य-6000’चा सर्वात महत्त्वपूर्ण हिस्सा तयार झाला आहे. या खास हिस्स्याच्या निर्मितीत इस्रोला सुमारे 700 वेळा वेल्डिंगचा प्रयत्न करावा लागला. परंतु अखेर यश मिळाले आहे. खोल समुद्रात पोहोचून तेथे संशोधन करण्याचे लक्ष्य सरकारने बाळगले आहे. याच उद्देशाने ‘समुद्रयान’ मोहीम सुरू करण्यात आली आहे, जी डीप ओशन मिशनचा हिस्सा आहे. या मिशनमध्ये वैज्ञानिक समुद्रात 6 किलोमीटर खोलवर जात तेथील रहस्यांची पडताळणी करतील.

तेथे कोणकोणती खनिजं आहेत, याची माहिती घेणार आहेत. तसेच तेथील जीवजंतूंचे अध्ययनही करणार आहेत. हे सर्व काही खास ‘याना’द्वारे केले जाईल, ज्याला ‘मत्स्य-6000’ नाव देण्यात आले आहे. मत्स्य-6000 या सबमर्सिबल यानात तीन जण सामावू शकतील. अत्यंत अधिक दबाव आणि अत्यंत कमी तापमानातही लोक सुरक्षित राहतील अशाप्रकारे याची निर्मिती करण्यात आली आहे. समुद्रात प्रचंड दबाव असल्याने ते मानवी शरीर सहन करू शकत नाही. याचमुळे माणसांना सामावून घेणारा हिस्सा अत्यंत मजबूत आणि खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे.

टायटॅनियमने निर्मित मानवी चेंबर

या यानाचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा हा टायटॅनियमने निर्मित एक गोल कक्ष असून याला पर्सनल स्फेयर म्हटले जात आहे. या हिस्स्यात वैज्ञानिक असणार आहेत. हा स्फेयर गोल आकाराचा असून याचा डायमीटर 2260 मिलिमीटर आहे आणि याच्या भिंती 80 मिलीमीटर जाडीच्या आहेत. टायटॅनियम हा अत्यंत मजबूत धातू असून तो जोडणे म्हणजेच वेल्ड करणे अत्यंत अवघड असते. वैज्ञानिकांनी याला जोडण्यासाठी खास तंत्रज्ञान अवलंबिले असून याला इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग म्हटले जाते. या वेल्डिंगला पूर्ण करण्यासाठी इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स सेंटरने स्वत:च्या जुन्या वेल्डिंग मशीनला अपग्रेड केले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article