दांपत्याने घेतला अनोखा निर्णय
मुलांसाठी वर्ल्ड स्कूलिंगचा अवलंब
शाळेत जाण्याची गरजच भासू नये अशाप्रकारचा विचार जवळपास प्रत्येक पिढीच्या बालपणी आला असेल. अलिकडेच एका अमेरिकन दांपत्याने आपण मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे सांगितले आहे. हे दांपत्य या मुलांना जगातील विविध देशांमध्ये नेते आणि मग ते वेगळा माणूस होतील अशाप्रकारचे ज्ञान मिळवून देते.
जगभरात प्रवास करत शिक्षण करविणे, पारंपरिक शिक्षणव्यवस्थेपासून हटवत मुलांना शिकविण्याचा मार्ग अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील डायना ब्लिंक्स आणि त्यांचे पती स्कॉट यांनी निवडला आहे. डायना (41 वर्षे) एक कंटेंट क्रिएटर असून त्यांच्या इन्स्टाग्रामवर 1.45 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या स्वत:च्या तीन मुली लुसिल (12 वर्षे), एडिथ (11 वर्षे) आणि हेजल (9 वर्षे) यांना घेऊन जुलै 2022 पासून ‘वर्ल्ड स्कूलिंग’ करत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने कॉर्पोरेट जगाच्या धावपळीतून बाहेर पडत मुलांना जगभ्रमण घडविण्याचा निर्णय घेतला. आमच्या मुलींनी पुस्तकातून नव्हे तर जीवनापासून शिकावे, जगाला स्वत: अनुभवावे अशी आमची इच्छा होती असे ते सांगतात.
40 देशांचा प्रवास
लुसिल आता स्पेनमये फ्लेमेंको डान्स शिकत आहे. एडिथ अथेन्समध्ये ग्रीक मिथोलॉजीचे धडे गिरवत आहे तर हेजल मोंटेनग्रोमध्ये सागरी जीवन संरक्षण शिकत आहे. या परिवाराने आतापर्यंत 40 हून अधिक देशांचा प्रवास केला, यात मोरक्को, आइसलँड, ग्रीस, थायलंड, पोर्तुगाल आणि आता उरुग्वे या देशांमध्ये वास्तव्य सामील आहे. आम्ही होमस्कूलिंग करू असे कधीच वाटले नव्हते, परंतु कोरोना संकटादरम्यान शाळा बंद झाल्यावर घरातून शिक्षण सुरू केले. यात मजा येऊ लागली, मुलांना घरातून शिकविणे शक्य असुन ते मजेशीर असल्याचे जाणीव झाली. मग आम्ही वर्ल्ड स्कूलिंगचे स्वरुप देण्याचा विचार केल्याचे डायना यांनी सांगितले.
वेगवेगळ्या देशांमध्ये शिकत आहेत कौशल्य
परिवाराने पॅरिस येथून प्रवास सुरू केला, मग मध्य अमेरिका, कोस्टा रिका, मेक्सिको आणि कॅरेबियनला भेट देली. पहिल्याच वर्षी या परिवाराने 22 देशांमध्ये भ्रमण केले. 2023 मध्ये त्यांनी दक्षिणपूर्व आशियाचा प्रवास केला, यात व्हिएतनाम, थायलंड, बाली आणि मग तीन महिने पोर्तुगालमध्ये वास्तव्य केले. जेथे ते ‘बाउंडलेस स्कूलिंग’ नावाच्या वर्ल्ड स्कूलिंग हबशी जोडले गेले. हे हब अशाप्रकारची केंद्रं असतात, जेथे मुले पारंपरिक शाळेप्रमाणे सकाळी 8.45 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत वर्गात बसतात आणि मग दुपारी एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज करतात. येथे मुले मित्र होतात आणि आईवडिलांनाही एक समुदायाचा अनुभव होतो. या हब्सने आमच्या मुलींना पारंपरिक शाळेप्रमाणे सामाजिक अनुभव दिले, परंतु याचबरोबर स्थानिक संस्कृतीचाही गंध दिला. थायलंडमध्ये आम्ही पॅड थाई आणि मँगो स्टिकी राइस तयार करणे शिकलो. तर उरुग्वेमध्ये चिविटो (लेयर्ड स्टीक सँडविच) शिकलो. लवकरच आम्ही ब्राझील, पर्टो रिको, कोलंबिया आणि मेक्सिकोला जाणार आहोत असे डायना यांनी सांगितले.