50 वर्षांपासून जंगलात राहतेय दांपत्य
मुलांचे पालनपोषण देखील येथेच
आजकाल लोक गावांमध्येही सुविधांशिवाय जगणे अवघड मानतात, अशा स्थितीत एका जोडप्याने 50 वर्षांपर्यंत जंगलात राहणे कसे असते हे दाखवून दिले आहे. डॅनो आणि रॉबिन यांनी 1970 च्या दशकाच्या अखेरपासूनच हवाईच्या मोलोकोईच्या वायालुआ खोऱ्यात लाकडाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या घरात राहत आहेत. नजीकचे शहर जवळपास 20 मैल अंतरावर आहे. वाहतूक, मोठ्या दुकानांपासुन दूर त्यांनी दशकांपासून घरातून काम करण्याची पद्धत विकसित केली आहे.
या जोडप्याने 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून टीव्ही पाहिलेला नाही. तसेच ते शक्य तितके गुगलपासूनही दूर राहतात. जंगलात 4 मुलांचे पालनपोषण केलेल्या या विवाहित जोडप्याने रोपं आणि प्राण्यांवर जीव लावला आहे. कोको बीन्सद्वारे स्वत:ची कॉफी तयार करण्यापासून वनौषधींद्वारे आरोग्य समस्यांवर मात करता. स्वत:च्या घराच्या आसपासच्या दोन एकर जमिनीत आढळून येणाऱ्या नैसर्गिक सपंदेचा वापर करण्यावर त्यांचा भर असतो.
अमेरिकेचे चित्रपट निर्माते पीटर सँटेनेलो यांच्या युट्यूब चॅनेलवर जवळपास 29.5 लाख सब्सक्रायबर असून त्यांनी अलिकडेच या जोडप्यासोबत दिवस घालविला आणि ऑफ-ग्रिड राहण्याचा अनुभव घेतला आहे. कित्येक आठवडे आम्ही आमच्याशिवाय अन्य माणूसच पाहत नसल्याचे डॅनो यांनी पीटर यांना सांगितले. डॅनो हे मूळचे सॅन दिएगोचे असून व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आल्यावर शेकडो लोकांनी स्वत:ची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका व्यक्तीने स्वत:च्या जीवनाच्या पद्धतीला चांगले ठरविले.