For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरी मोठा झाला तरच देश समृद्ध होईल!

10:25 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकरी मोठा झाला तरच देश समृद्ध होईल
Advertisement

श्रीराम ट्रॅक्टर, कृषी अवजारे नूतन शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विचार

Advertisement

वार्ताहर /उचगाव

शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. तो जगला आणि मोठा झाला तर देश समृद्ध होईल. शेतकरी वर्गाकडून अशा व्यवसायांना चालना मिळाली, व्यवसायात तो उतरला तर खऱ्या अर्थाने शेतकरी मोठा होईल, व्यावसायिक बनेल आणि शेती व्यवसाय समृद्ध होईल, असे विचार पालकमंत्री, बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. बेळगाव मार्केटयार्डमध्ये महिंद्रा ट्रॅक्टर्स, संचलित श्रीराम ट्रॅक्टर व कृषी अवजारे या नूतन शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती व श्रीराम ट्रॅक्टर्स, कृषी अवजारे या नूतन शोरूमचे मालक पुंडलिकराव कदम-पाटील होते. कार्यक्रमाला उत्तरचे आमदार राजू सेठ, एपीएमसीचे माजी अध्यक्ष शिवनगौडा पाटील, अडत व्यापारी बसवंत मायाण्णाचे, एपीएमसीचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब जाधव, भाजी मार्केटचे अध्यक्ष बसनगौडा आदी मान्यवर उपस्थित होत;. मनीषादेवी पुंडलिकराव कदम-पाटील, पौर्णिमा पुंडलिकराव कदम-पाटील यांनी सतीश जारकीहोळी यांचे औक्षण केले. यानंतर सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नूतन शोरूमचे फीत कापून उद्घाटन केले. संपूर्ण शोरुम अद्ययावत यंत्रणेने सजविण्यात आलेले पाहून त्यांनी कदम-पाटील यांचे अभिनंदन केले. व्यासपीठावरील मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रास्ताविकात पुंडलिकराव कदम-पाटील म्हणाले, जन्मापासून मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांची व्यथा, दु:ख, हाल मी जवळून पाहिले आहेत. या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि शेती व्यवसाय मोठा होण्यासाठी या व्यवसायाचा आम्ही शुभारंभ करत आहोत.

Advertisement

पालकमंत्र्यांचे कायमच सहकार्य

अडत व्यापारी बसवंत मायाण्णाचे म्हणाले, एपीएमसीमध्ये ज्यावेळी समस्या निर्माण झाल्या. त्यावेळी जारकीहोळी धावून आले. त्यांनी अनेक समस्या सोडविल्या आहेत. यापुढेही त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे. शिवनगौडा पाटील यांनीही एपीएमसी मार्केट यार्डमध्ये जो सरकारचा टॅक्स बसतो त्या टॅक्ससंदर्भात जारकीहोळींनी लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना सोयीचे शोरूम करून सहकार्य करणारे पुंडलिकराव कदम-पाटील, विक्रमसिंह पुंडलिकराव कदम-पाटील यांचाही यावेळी सतीश जारकीहोळींच्या हस्ते सन्मान केला. कार्यक्रमप्रसंगी एपीएमसीमध्ये जे गाळे आहेत, त्या गाळ्यामध्ये फ्रुटमार्केटचा शुभारंभ करावा, अशा प्रकारचे निवेदन फ्रुटमार्केटतर्फे सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केल. विक्रमसिंह पुंडलिकराव कदम-पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व व्यापारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्मयासह सहा तालुक्मयातील शेतकरी, नागरिक, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.