देशाला नाही राजधानी
कुठल्याही देशाची राजधानी हेच त्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र असते आणि तेथुनच देशाच्या कामकाजाचे संचालन होते. परंतु जगात एक असा देश आहे, ज्याला राजधानीच नाही. जगात एकूण 195 देश असून त्यांची स्वत:ची एक राजधानी आहे. परंतु नाउरू या देशात राजधानी नाही. नाउरू हा देश छोट्या आणि मोठ्या बेटांनी मिळून तयार झालेला आहे. याचमुळे याला जगातील सर्वात छोटा बेटसदृश देशही म्हटले जाते.
हा देश दक्षिण प्रशांत महासागरात असून तो 21 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेला आहे. याला नॉरू नावानेही ओळखले जाते. येथे पारंपरिक स्वरुपात 12 समुदायांचे शासन असायचे. या देशाच्या ध्वजातही याचा प्रभाव दिसून येतो. येथील लोक जंगलामधून मिळणाऱ्या खजिनातून मोठी कमाई करत होते. परंतु आता नारळाच्या उत्पादनातून उदरनिर्वाह केला जात आहे. येथील लोकसंख्या खूपच कमी असून येथील लोक राष्ट्रकूल स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्येही भाग घेतात. येथील मुख्य शहर यारेन आहे.
हा देश केवळ दोन तासांत पूर्ण फिरून होऊ शकतो. हा देश अत्यंत छोटा असला तरीही येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळच नाउरूला उर्वरित जगाशी जोडते आणि हे पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या देशात मोठ्या संख्येत जगभरातून पर्यटक दाखल होत असतात.