महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पक्ष्याचा पंखाची पिसांची किंमत २३ लाख

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यूझीलंडमध्ये एका पक्ष्याच्या पंखाच्या पिसाला लिलावात 46,521 डॉलर्स (सुमारे 23 लाख रुपये) इतकी किंमत मिळाली आहे. हे पिस 100 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी विलुप्त झालेल्या हुइया पक्ष्याचे आहे. न्युझीलंडच्या विलुप्त झालेल्या हुइया पक्ष्याच्या पंखाचे हे पिस जगातील आतापर्यंतचे सर्वात महाग पिस असून ते सर्वात मोठ्या लिलावात विकले गेले आहे. गोल्ड ब्रोकरच्या डाटानुसार पिसाचे वजन जवळपास 9 ग्रॅम असल्याने ते सोन्यापेक्षाही अधिक महाग ठरले आहे. हुइया पक्षी अखेरचा 1907 मध्ये दिसून आला होता. परंतु 1920 च्या दशकापर्यंत तो अस्तित्वात होता, असे मानले जात आहे.

Advertisement

वेब्स ऑक्शन हाउसमध्ये डेकोरेटिव्ह आर्ट्सच्या प्रमुख लीह मॉरिस यांनी पंखाचा हा पिस अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले आहे. यात अद्याप स्वत:ची वेगळी चमक आहे. पंखाला अत्यंत दीर्घ काळापर्यंत राखण्यासाठी लिलावघराच्या अधिकाऱ्यांनी त्याला आर्काइवल पेपरसोबत युव्ही-प्रोटेक्टिव ग्लासच्या मागे ठेवले होते. पंखाचा हा पिस पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक आले होते, असे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

हुइया पक्ष्याच्या पंखाचा हा पिस सुमारे 100 वर्षे जुना आहे. तसेच एका खासगी संग्राहकाच्या ताब्यात होता. काही काळापासून या संग्राहकाने तो दुसऱ्याला सोपविण्याचा विचार चालविला होता अशी माहिती लिलावघराच्या तज्ञ फ्लोरेन्स एस. फोरनियर यांनी दिली. हुइया पक्ष्याचे माओरी या मूळ रहिवाशांसाठी अत्यंत मोठे महत्त्व होते आणि त्याचा माओरी समुदायाच्या गीत आणि कहाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उल्लेख आहे. हुइया पक्ष्याच्या पंखाद्वारे तयार हेडपीस केवळ माओरी राजांनाच परिधान करण्याची अनुमती होती. युरोपीय लोक न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर या दुर्लभ पक्ष्याच्या पंखांच्या हव्यासापोटी हुइया पक्षी विलुप्त झाला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article