4 कोटीत विकले गेले नाणे
जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिसण्यास सामान्य वाटतात, परंतु त्यांची किंमत ही अपेक्षेपेक्षाही अधिक असते. एका अशाच नाण्याच्या निर्मितीकरता काही शेकडो रुपये किंवा हजार रुपये खर्च आला असेल, परंतु त्याचा जेव्हा लिलाव झाला, तेव्हा त्याला 4 कोटी रुपयांची किंमत प्राप्त झाली आहे.
हे नाणे 1975 मध्ये निर्माण करण्यात आले होते. या नाण्याला 20 व्या शतकातील सर्वात दुर्लभ नाण्यांपैकी एक ठरविण्यात येत आहे. हे नाणे एक अमेरिकन डाइम असून त्याची निर्मिती 1975 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या टंकसाळीकडून करण्यात आली होती असे लिलाव करणाऱ्या संस्थेकडून सांगण्यात आले.
या नाण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचे चित्र आहे. याचबरोबर या नाण्यावर ‘एस’चे चिन्ह निर्माण करण्यात आलेले नाही. हे चिन्ह प्रत्येक नाण्यावर असते. अशाप्रकारची नाणी जगात केवळ दोनच आहेत. याचमुळे हे नाणे अत्यंत अधिक दुर्लभ ठरले आहे.
या दुर्लभ नाण्याचा लिलाव ग्रेट कलेक्शन नावाच्या लिलावघराने ऑनलाइन स्वरुपात करविला होता. या नाण्याच्या लिलाव यशस्वी ठरल्याने अत्यंत आनंदी आहे. या नाण्याला 4.25 कोटी रुपयांची किंमत मिळाल्याचे कॅलिफोर्निया ग्रेट कलेक्शनचे अध्यक्ष इयान रसेल यांनी म्हटले आहे.
लिलावापूर्वी हे नाणे ओहियोच्या तीन बहिणींकडे होते. परंतु त्यांनी स्वत:ची ओळख गुप्त ठेवली आहे. हे नाणे आम्हाला आमच्या भावाच्या मृत्यूनंतर मिळाले होते. आमचा भाऊ आणि आईकडे अशाप्रकारची दोन नाणी होती. परंतु 1978 मध्ये यातील एक नाणे आमच्या परिवाराने 15 लाख रुपयांमध्ये विकले होते असे या बहिणींनी सांगितले आहे.