कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महापौर कक्षाबाहेरील नामफलकावर झाकलेला कपडा अखेर हटविला

12:23 PM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयुक्तांच्या सूचनेनंतर कौन्सिल विभागाकडून कार्यवाही

Advertisement

बेळगाव : महापौर कक्षाबाहेरील मंगेश पवार यांच्या नामफलकावर झाकण्यात आलेला कपडा बुधवारी काढण्यात आला आहे. मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या सूचनेवरून कौन्सिल विभागाकडून सदर कपडा हटविण्यात आला असला तरी बुधवारी दिवसभर महापौर मंगेश पवार महापालिकेकडे फिरकले नाहीत. खाऊकट्टा प्रकरणी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांनी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविले आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाविरोधात नगरविकास खात्याकडे दोघांनीही दाद मागितली होती. त्यानुसार नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी सदर प्रकरणाची सुनावणी घेऊन निर्णय राखून ठेवला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी दोघांचा अर्ज फेटाळल्याचे नगरविकास खात्याकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे दोघेही पुन्हा अपात्र ठरले. प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाविरोधात पुन्हा दोघांकडून धारवाड उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात आली.

Advertisement

सोमवारी दाखल केलेल्या रिट पिटीशनला मंगळवारी स्थगिती मिळाली असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप अधिकृतरीत्या स्थगितीचा आदेश मनपाला मिळालेला नाही. तसेच या प्रकरणाची सुनावणी सोमवार दि. 7 रोजी होणार आहे. महापौर मंगेश पवार यांनी बुधवारी सकाळी कौन्सिल विभागाला फोन करून सरकारी वाहन आपल्या घरी पाठविण्याची सूचना केली. मात्र, स्थगितीचा आदेश अद्याप मिळालेला नसल्याने वाहन पाठवता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर सोमवारी महापौर कक्षाबाहेरील मंगेश पवार यांच्या नामफलकावर कपडा झाकण्यात आला होता. तो बुधवारी दुपारपर्यंत तसाच होता. मात्र, दुपारनंतर मनपा आयुक्तांनी नामफलकावरील कपडा काढण्याची सूचना कौन्सिल विभागाला केल्याने सायंकाळी कपडा हटविण्यात आला. बुधवारी दिवसभर महापौर मंगेश पवार महानगरपालिकेकडे आले नाहीत. नेहमीप्रमाणे उपमहापौर वाणी जोशी महापालिकेत दाखल होऊन त्या आपल्या कक्षात हजर होत्या. इतर नगरसेवक व अधिकारीदेखील महापालिकेत ये-जा करत होते. पण महापौर कक्षात कोणीही प्रवेश केला नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article