For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येथे मिळते जगातील सर्वात स्वच्छ पाणी

06:07 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
येथे मिळते जगातील सर्वात स्वच्छ पाणी
Advertisement

मिनरल्सचा आहे खजिना

Advertisement

जल हेच जीवन असल्याचे आम्हा सर्वांनी ऐकले आहे, याचमुळे पाणी वाया घालविले जाऊ नये आणि ते वाचविले जावे. परंतु जगात सर्वात स्वच्छ आणि गोड पाणी कुठे मिळते हे तुम्हाला माहित आहे का?  समुद्राचे पाणी खारे असते, परंतु जगातील सर्वात गोड पाणी कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

जगातील वाढत्या प्रदूषणानंतरही निसर्गात अशी गोड पाण्याची सरोवरं आजही अस्तित्वात आहेत. यातील एका सरोवराचे पाणी सर्वात साफ अन् गोड आहे. या सरोवराचे नाव बॅकाल सरोवर आहे. याला जगातील सर्वात गोड पाण्याचे सरोवर म्हटले जाते. हे सरोवर रशियात आहे.

Advertisement

बॅकाल सरोवराला जगातील सर्वात जुने आणि खोल सरोवर म्हणूनही ओळखले जाते. हे सरोवर दक्षिण सायबेरियात असून तेथे जगातील जवळपास 20 टक्के गोड पाणी आहे. बॅकालला जगातील सर्वात स्वच्छ सरोवर मानले जाते. तसेच हे जगातील सातव्या क्रमांकाचे विशाल सरोवर आहे. 1996 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा घोषित केले होते. हे सरोवर अत्यंत दुर्गम भागात असल्याने ते अजून स्वच्छ राहिले आहे. या सरोवराचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून तो मानवी वस्तींपासून शेकडो मैल अंतरावर आहे.

Advertisement
Tags :

.