For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाडलोसमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रचारात मुसंडी

04:25 PM May 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पाडलोसमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रचारात मुसंडी
Advertisement

गुलाल आम्हीच उधळणार ; महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा दावा

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पाडलोसमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. विजय आपलाच होणार व गुलालही आम्हीच उधळणार असा दावा महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच पाडलोस मधून बहुमत देण्याचा मानसही कार्यकर्त्यांनी दाखवला. पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवून आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रचारास सुरूवात झाली. वेगवेगळे मुद्दे तसेच आरोप प्रत्यारोप करताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते दिसले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा साथ द्या अशी आर्त हाक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दिली. तर महायुतीच्यावतीने रिंगणात असलेले नारायण राणे यांना पाठिंबा द्या असे आवाहन युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना केले. दरम्यान, आवाहन-साथ द्या असे जरी मतदारांना सांगितले तरी कोणी कुणाला कौल दिला हे दि. 4 जून रोजी स्पष्ट होणार. असे असले तरी गुलाल आम्हीच उधळू असा दावा महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमधून केला जात होता.

Advertisement

Advertisement

.