सीजेआय’यांच्या आश्वासनामुळे व्हीआयचे समभाग चमकले
समभाग 6 टक्क्यांनी वधारले : एजीआर थकबाकीबाबत कंपनीच्या याचिकेला परवानगी
नवी दिल्ली :
कर्जबाजारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे शेअर्स मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 6 टक्क्यांनी वाढून 17.66 रुपयांवर पोहोचले. भारताच्या सरन्यायाधीशांनी (सीजेआय) एजीआर थकबाकीबाबत कंपनीच्या याचिकेला परवानगी दिल्यानंतर शेअर्समध्ये वाढ झाली. व्होडाफोन आयडियाने 15 जुलै रोजी सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या 2019 च्या पेमेंट्सच्या निकालाविरुद्ध आपली याचिका त्वरित सूचीबद्ध करण्याची विनंती केली होती.
कंपनीच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर सीजेआयकडून हे आश्वासन मिळाले.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टेलिकॉम कंपनीला आश्वासन दिले की सूचीबद्ध करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. ब्रोकरेज फर्म सिटीने आपले रेटिंग कायम ठेवले आहे दरम्यान, सीजेआयच्या याचिकेवर विचार करण्यास सहमती दिल्यानंतर, जागतिक ब्रोकरेज फर्म सिटीने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे.
व्होडाफोनचा शेअर
6 टक्केपर्यंत वाढला
एजीआरमधील ताज्या घडामोडींवर ब्रोकरेज फर्म सिटीच्या ‘तेजी’ दृष्टीकोनामुळे व्होडाफोन आयडियाचा समभाग इंट्रा-डे ट्रेडमध्ये
5.8 टक्क्यांनी वाढून 17.66 रुपयांवर पोहोचला. तथापि, शेवटी तो 1.20 टक्के किंवा 0.20 पैशांनी वाढून 16.88 रुपयांवर बंद झाला.