जपानचे कामिकत्सु शहर ठरले अनुकरणीय
2030 पर्यंत प्राप्त करणार कार्बन न्युट्रलिटी : 80 टक्के लक्ष्य पूर्ण : 45 प्रकारे होते वेस्ट रिसायकलिंग
हवामान बदल जगासाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. अशा स्थितीत जपानचे एक शहर जगासाठी उदाहरण म्हणून समोर आले आहे. येथील कामिकत्सु पालिका 2003 सालीच जपानमधील पहिले झिरो वेस्टयुक्त क्षेत्र घोषित झाले. 2030 पर्यंत या शहराला कार्बन न्यूट्रल करण्याचे देखील लक्ष्य आहे.
हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी येथे 80 टक्के काम देखील करण्यात आले आहे. या भागातील लोक स्थानिक उद्योगासोबत मिळून अधिकाधिक पुनर्वापर होऊ शकणारी सामग्री वापरण्यासाठी प्रेरित करतात.
केवळ गरजेच्या सामग्रीचा वापर
ज्या गोष्टीची गरज आहे, त्याचाच केवळ वापर करण्यावर शहरातील हॉटेल्स देखील भर देतात. चेक इन वेळी संबंधित व्यक्ती अतिरिक्त सामग्री हटवू शकतो. मोठय़ा उद्योजकापासून सामान्य व्यक्ती देखील अन्नाची कमीत कमी नासाडी व्हावी असा प्रयत्न करतो.
कागदी सामग्रीबद्दल पद्धत
या शहराचे लोक कुठे बाहेर जायचे असल्यास भागीदारीत वाहनांचा वापर करतात. झिरो वेस्ट अवलंबिण्याच्या पद्धतींना मोठय़ा शहरांमध्येही स्वीकारण्यात आले आहे. शहराच्या रिसायकलिंग प्रकल्पात कचऱयाला 45 शेणींमध्ये विभागण्यात आले आहे. यात कागदापासून तयार करण्यात आलेल्या गोष्टींना वेगळे करण्याच्या एकूण 9 पद्धती आहेत.
लोकांना करतात जागरुक
लोकांना प्रेरित करण्यासाठी एक रिसायकलिंग सिस्टीम देखील आहे. यात गोष्टी पर्यावरणस्नेही सामग्रीत बदलता येते. पुर्नवापरक्षम असलेल्या सामग्रीपासून काही चित्रेs देखील तयार करण्यात आली आहेत. यामुळे शहराचा किती पैसा वाचतो हे या चित्रांवर दर्शविण्यात आले आहे.