महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरालाच जडलाय स्थुलत्वाचा आजार

06:32 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगभरात अशी अनेक शहरं आहेत, जेथे लोकांच्या आहाराचा एक निश्चित पॅटर्न आहे. अनेक ठिकाणी लोक बाहेरचे खाणे पसंत करतात तर काही ठिकाणी लोक रेस्टॉरंटमध्ये खाणे पसंत करत नाहीत. परंतु ब्रिटनच्या एका शहरात तर वेगळीच स्थिती आहे. येथील निम्म्याहून अधिक लोक स्थुल असून ते बाहेरचे खाणे  इतके पसंत करतात की एका दिवसात 3-3 वेळा बाहेरचे खात असतात. त्यांच्यामुळे डिलिव्हरी सर्व्हिसवाल्यांवर संकट ओढवले आहे.

Advertisement

एबूवायल हे साउथ वेल्समधील एक शहर आहे, ज्याला युनायटेट किंगडमचे स्थुल लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. एकेकाळी हे शहर स्टील हब होते, परंतु आता हे स्थुल लोकांसाठी प्रसिद्ध ठरले आहे. येथे 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेले परंतु ओव्हरवेट असलेल्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. हे लोक ओबीस श्रेणीत मोडतात. अनेक डिलिव्हरी ड्रायव्हर्सनुसार ते एका दिवसात 3-3 वेळा एकाच ग्राहकाच्या घराला भेट देत असतात.

Advertisement

आमचे शहर स्थुलत्वाला सामोरे जात आहे. माझेही वजन खूप वाढले होते, यामुळे मला गॅस्ट्रिक बँड परिधान करण्याची गरज भासली होती. शहरात  टेकअवे अन् फास्टफूडच्या जागा लोकांची भूक भागवत आहेत. फास्ट फूड चेन्सची सवय लोकांना जडली असल्याने ते स्थुल होत चालल्याचे 37 वर्षीय ब्युटिशियन जोडी ह्यूजने म्हटले आहे.

स्वस्ततेमुळे फास्टफूडवर भर

यामागील सर्वात मोठे कारण अर्थव्यवस्था आहे. फास्ट फूड स्वस्त गोष्टींमध्ये सामील आहे. यामुळे अधिक लोक तेच फस्त करत आहेत. दुसरे कारण लोकांकडे कमी वेळ आहे. स्वादिष्ट, सकस आणि स्वस्त खाणे तयार करणे नेहमी सोपे नसते. शहरात आता वजन कमी करविण्याचे कोर्स सुरू झाले असून यात लोक नोंदणी करून वजन कमी करू पाहत आहेत असे जोडी ह्यूजने सांगितले.  जर कुणी आरोग्यदायी आणि ऑर्गेनिक फूड खाऊ इच्छित असेल तर त्याला अधिक पैसे खर्च करावे लागतात. अशा स्थितीत लोक सहजपणे मिळणारे अन् स्वस्त खाद्यपदार्थ खाणे पसंत करतात असे 55 वर्षीय स्थायिक व्यावसायिक स्कॉट यांनी सांगितले

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article