समुद्रातून 2 हजार वर्षांनी वर येतेय शहर
ज्वालामुखीने बुडविले होते हसते-खेळते रोमन शहर
इटलीचे 2 हजार वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेले शहर पुन्हा जगासमोर येत आहे. एनेरिया नावाच्या या शहराला ज्वालामुखीने उदध्वस्त केले होते. इटलीच्या इस्चिया बेटावर 180 व्या साली क्रेटियो ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. यामुळे निर्माण झलोल्या प्रचंड लाटांनी रोमन बंदर शहर ऐनारियाला समुद्रात बुडविले होते. आता पाण्याखालील सैर आणि सुरू असलेल्या उत्खननामुळे याचा आकर्षक इतिहास पुन्हा पृष्ठभागावर आणला जात आहे. इटलीच्या इस्चिया बेटाच्या किनाऱ्यावर हरवलेल्या या रोमन शहराचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत.
पुरातात्विक उत्खनन आणि पाण्याखालील पर्यटनाद्वारे या शहराला जगाच्या नजरेत परत आणले जात आहे. हे कार्टारोमानाच्या उपसागरात स्थित अवशेषीय पृष्ठभागाखाली स्थित आहे. मोठ्या संख्येत लोक काचेचा तळ असलेल्या नौकेतून किंवा स्नॉर्कलिंगद्वारे हे स्थळ पाहू शकतात. येथे प्राचीन घाट, रोमन कलाकृती आणि समुद्र तळावर संरक्षित दगडी संरचना आहेत.
दीर्घकाळापासून संशोधन
या शहराचा प्रारंभिक सुगावा 1970 च्या दशकात लागला, तेव्हा पाणबुड्यांना इस्चिया किनाऱ्यावर मातीची भांडी आणि सिल्लियांचे तुकडे मिळाले. तर 2011 मध्ये स्थानिक खलाशी आणि इतिहासकारांना समुद्राच्या तळाच्या दोन मीटर खाली दाबले गेलेल्या विशाल रोमन घाटाचे अवशेष दिसून आले. यानंतर एम्फोरा, मोजाइक, नाणी, समुद्र किनारी व्हिलाचे अवशेष आणि लाकडी रोमन जहाज येथे मिळाले.
ग्रीक डोमेन मानले जाणारे इस्चिया दीर्घकाळापर्यंत स्वत:चे थर्मल स्प्रिंग्स आणि ख्रिस्तपूर्व 750 च्या प्रारंभिक ग्रीक वसाहतीकरणामुळे प्रसिद्ध राहिले. ख्रिस्तपूर्व 322 साली रोमन नियंत्रणानंतर या बेटाचे नाव बदलून एनेरिया करणत आले. हे नाव प्लिनी द एल्डर आणि स्ट्रॅबोच्या शास्त्राrय ग्रंथांमध्येही आढळून येते. परंतु आतापर्यंत रोमन वसाहतीचे भौतिक पुरावे दुर्लभ राहिले आहेत.
जुन्या समजुतीला आव्हान
रोमन्सनी इस्चियावर कधीच शहर स्थापन केले नव्हते, असे मानले जाते. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट होती. एखाद्या समकालीन रोमन अभिलेखात याचे वर्णन नसल्याने शतकांपर्यंत हे स्थळ ज्वालामुखीय तळाखाली दडलेले राहिले. ऐनारिया केवळ बंदर नव्हते तर एक आवासीय केंद्र देखील होते, हे शोधातून कळल्याचे पुरातत्व तज्ञ एलेसेंड्रा बेनिनी यांनी म्हटले आहे.
रोमन सैन्य अभियानांमध्ये ऐनारियाची रणनीतिक भूमिका राहिल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच व्यापारी पुरावे देखील ठोस आहेत. या स्थळावर आढळलेला एम्फोरा भूमध्य समुद्राच्या पार 12 उत्पादन केंद्रांपैकी आहे. पर्यटक लवकरच येथे थेट उत्खनन पाहू शकणार आहेत. ऐनारियाचा 3डी व्हिडिओ, याचे रस्ते, इमारती आणि समुद्र किनारा दाखविणार आहे.