For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोम्बी टाउन अशी शहराची ओळख

06:40 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
झोम्बी टाउन अशी शहराची ओळख
Advertisement

लोकसंख्येपेक्षा थडग्यांची संख्या अधिक

Advertisement

भूतांचे शहर, पिशाचांचे गाव अशाप्रकारची विशेषणं अनेकदा ऐकली असतील. परंतु जगाच्या एका कोपन्यात एका शहराला झोम्बी टाउन किंवा आत्मांचे शहर म्हटले जाते. मजेची गोष्ट म्हणजे येथे कुठल्याही प्रकारचे भूत नाही. तसेच भूत-प्रेत किंवा झोम्बीच्या कहाण्याही प्रचलित नाहीत. लोक जिवंत राहण्याप्रकरणी स्वत:ला अत्यंत सुदैवी मानत असल्याने हे नाव मिळाले आहे.

कॅलिफोर्निया प्रांतातील सॅन फ्रान्सिस्को महानगरच्या दक्षिणेत कोल्मा नावाचे ए छोटेसे शहर आहे. येथे मागील अनेक दशकांपासून येथे राहणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा थडग्यांची संख्या अधिक झाली आहे. येथील प्रत्येक एका जिवंत व्यक्तीमागे एक हजार थडगी ओत. याचमुळे लोक याला आत्मांचे शहर आणि झोम्बी टाउन म्हणतात.

Advertisement

या शहराची लोकसंख्या आता केवळ 1550 राहिली आहे. तर येथे 15 लाख थडगी आहेत. कोल्माची ही स्थिती निर्माण होण्यास 1912 मध्ये सुरुवात झाली होती. तेव्हा शेजारचे शहर सॅन फ्रान्सिस्कोने दफनभूमी निर्माण करण्यावर बंदी घातली होती. तेथे लोकसंख्या वाढण्यासोबत जमीन अत्यंत महाग होत चालल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.

1900 च्या दशकाच्या सुरुवातीस सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 27 दफनभूमी होत्या. आता हा आकडा केवळ 2 वर आला आहे. याचा अर्थ तेथे मृतदेह उकरून बाहेर काढण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये दफनभूमी खणून काढत दीड लाखाहून अधिक मृतदेह कोल्मा येथे नेण्यात आले होते, हा प्रकार सर्वात मोठा ‘मृतांच्या प्रवासा’पैकी एक होता.

याच्या काही दशकांमध्ये कोल्मा हे सॅन फ्रान्सिस्कोच्या मृतदेहांनी भरून गेले. 1924 मध्ये हे अधिकृत ‘नेक्रोपोलिस’ म्हणजेच ‘थडग्यांचे ठिकाण’ ठरले. येथे कधीच मृतांपेक्षा जिवंत व्यक्तींची संख्या अधिक राहिली नाही. परंतु हे शहर आता फूल विक्रेते आणि अन्य विक्रेत्यांसाठी संपन्न स्थळ ठरले आहे. काळासोबत येथील लोक स्वत:ला थडग्यांचे राखणदार मानतात.

Advertisement
Tags :

.