For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृतांच्या शहराचा लागला शोध

06:22 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृतांच्या शहराचा लागला शोध
Advertisement

इजिप्तमध्ये सापडली प्राचीन दफनभूमी

Advertisement

इजिप्तमध्ये एका प्राचीन दफनभूमीचा शोध लागला असून यात 300 हून अधिक दफन ममी सापडल्या आहेत. 300 हून अधिक ममींच्या कब्रांना वैज्ञानिकांनी ‘मृतांचे शहर’ असे नाव दिले आहे. पुरातत्व तज्ञांनी आगा खान तृतीयच्या आधुनिक मकबऱ्यानजीक डोंगरावरील एका स्थळी ही थडगी शोधली आहेत. तेथे 5 वर्षांपासून उत्खनन सुरु आहे.

ही दफनभूमी सुमारे 2 लाख 70 हजार फुटांपर्यंत फैलावली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका पथकाने येथे 36 नवी थडगी शोधली आहेत. या ठिकाणाचा वापर 900 वर्षांपर्यंत केला जात राहिला असावा असा अनुमान आहे. म्हणजेच ख्रिस्तपूर्व 6 व्या शतकापासून 9 व्या शतकापर्यंत याचा वापर झाला आणि प्रत्येक कब्रमध्ये 30-40 लोकांचे अवशेष होते.

Advertisement

30-40 टक्के अवशेष नवजात आणि किशोरवयीनांचे होते. यातील अनेक साथीच्या आजारांमुळे मृत्युमुखी पडले होते अशी माहिती इजिप्तच्या पुरातन अवशेष प्रभागाचे प्रमुख अयमान अश्मावी यांनी दिली आहे. मिलान विद्यापीठाच्या पुरातत्व तज्ञ पॅट्रिजिया पियासेंटिनी यांच्या नेतृत्वात प्राचीन शहर असवान विषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी टीम संशोधन करत आहे.

हा खरोखरच एक मोठा शोध होता. असवानच्या लोकांनी डोंगराला कब्रांनी झाकोळले होते. हे एकप्रकारचे मृतांचे शहर आहे. आता असवान या नावाने ओळखले जाणारे शहर पूर्वी स्वेनेट म्हणून ओळखले जायचे आणि नंतर स्वान असे याचे नाव होते. या वाणिज्यिक केंद्रात आफ्रिका आणि युरोपच्या दुर्गम भागांतील व्यापारी यायचे असे पियासेंटिनी यांनी सांगितले.

असवान नेहमीच एक क्रॉसिंग पॉइंट राहिले आहे. लोक येथे यायचे, कारण ही एक सीमा होती. दक्षिणेतून उत्पादने असवानमध्ये यायची आणि मग दुसऱ्या ठिकाणी पाठविली जायची. मृतांच्या शहराची ओळख सर्वप्रथम 2019 मध्ये झाली होती, जेव्हा दोन मुले आणि त्यांच्या आईवडिलांची ममी असणारी एक कब्र शोधली गेली होती. त्यानंतर प्रत्येक उत्खननात आणखी अनेक ममी सापडल्या आहेत. 2000 वर्षांपूर्वीच्या एका अज्ञात समाजाविषयी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.