For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निधी वळविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

10:23 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
निधी वळविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
Advertisement

भीम आर्मीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : राज्यामध्ये दलित आणि अल्पसंख्यांकाच्या मतांवर सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारकडूनच या समाजातील नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. या समाजाच्या विकासासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी गॅरंटी योजनेसाठी वळविण्यात आला आहे. यामुळे अल्पसंख्यांकांच्या विकासाला खिळ बसली आहे. सरकारने सदर निधी त्वरित या समाजाच्या विकासासाठी परत करावा, अशी मागणी करत भीम आर्मीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.अनुसूचित जाती-जमाती व अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेला 15 हजार कोटी रुपयांचा निधी गॅरंटी योजनांसाठी वापरला आहे. यामुळे मागासवर्गीय समाजाला धक्का बसला आहे.

या समाजाच्या विकासासाठी सरकारकडून अनेक योजना राबवत आहेत. मात्र निधी नसल्याने योजना कागदावरच राहिली आहे. सरकारने राखीव ठेवलेला निधी गॅरंटी योजनेसाठी वापरल्यामुळे मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजनांना निधी मिळणे कठीण झाले. निधी इतर योजनांसाठी वळविल्याप्रकरणाची चौकशी करावी, तसेच वाल्मिकी निगममध्येही कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. याचीही चौकशी करावी. पोलीस उपनिरीक्षक परशुराम छलवादी यांच्या आत्महत्येमुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येमागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारने याची सखोल चौकशी करावी, आत्महत्या केलेल्या पीएसआयच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. सरकारकडूनच अल्पसंख्यांकांची फसवणूक करण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.