महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगावातील सभास्थळाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

11:10 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत असून त्यांची जाहीरसभा मडगावात होणार आहे. ही सभा मडगाव कदंब बसस्थानकावर घेतली जाणार आहे. या जागेची पाहणी हल्लीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर तसेच भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी केली. सभेच्या आयोजनासाठी अवघेच दिवस शिल्लक असल्याने तातडीने सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. कदंब बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून या ठिकाणी 40 ते 50 हजार लोकांना सामावून घेणे शक्य असल्याच्या निर्णयाप्रत यंत्रणा आलेली आहे. या सभेतूनच भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

Advertisement

बसस्थानकावर कचरा पाहून मुख्यमंत्री झाले नाराज

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ‘विकसित भारत रॅली’चे उदघाटन कदंब बसस्थानकावरून केले जाणार आहे. त्याची पाहणी करण्यसाठी मुख्यमंत्री मडगाव कदंब बसस्थानकावर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना कदंब बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे दर्शन झाले व ते पाहून मुख्यमंत्री नाराज झाले. या ठिकाणी कचरा टाकण्याबाबत एक-दोन प्रŽ उपस्थित केले आणि अधिकाऱ्यांनाही दररोज या जागेची स्वच्छता करण्यास सांगितले. बसस्थानकाच्या परिसरात सर्रासपणे कचरा टाकला जातो. कचरा उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे कचरा जाळून टाकला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. बसस्थानकात निर्माण होणारा कचरा गोळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा विकसित केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता

दरम्यान, कदंब बसस्थानकावर ही सभा घेतल्यास कदंब बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारली जात नाही. मुंबईला जाणाऱ्या बसगाड्या इतर मोकळ्या जागेत हलविण्यात येतील अशी माहिती प्राप्त झाली तरी सद्या सुरू असलेला कदंब बसस्थानक बंद ठेवला जाणार का हे मात्र, स्पष्ट झालेले नाही. हा बसस्थानक बंद ठेवल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article