For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांसह घेतल्या अनेक मंत्र्यांच्या भेटी

12:51 PM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांसह घेतल्या अनेक मंत्र्यांच्या भेटी
Advertisement

सर्वांचे केले अभिनंदन,मंत्र्यांसमोर मांडले गोव्याचे विषय

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी गोवा राज्याशी संबंधित काही प्रश्न तसेच विषयावर बोलणी करण्यात आली. त्या संदर्भात डॉ. सावंत यांना संबंधित मंत्र्यांनी आश्वासने दिली.

डॉ. सावंत यांनी मोदी यांचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानपदाची कारकीर्द यशस्वी व्हावी म्हणून त्यांच्याशी हस्तांदोलन कऊन विकसित गोव्यासाठी मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळावा या करिता सावंत यांनी त्यांच्याकडे विनंती केली. त्यासाठी सर्व ती मदत करण्याची ग्वाही मोदी यांनी दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

Advertisement

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचीही डॉ. सावंत यांनी भेट घेतली. त्यांचे अभिनंदन कऊन त्यांना मंत्रिपदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. सावंत हे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनाही भेटले. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या आणि राष्ट्रीय महामार्ग 66 ला जोडणाऱ्या नवीन 6 पदरी रस्त्याचे उद्घाटन करावे म्हणून गडकरी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

एमईएस कॉलेज जंक्शन ते बोगमाळो जंक्शन या चार पदरी रस्त्याची पायाभरणी करण्याची विनंती गडकरी यांना केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,  पर्यावरणमंत्री उपेंद्र यादव, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांचीही भेट घेऊन डॉ. सावंत यांनी गोव्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.

Advertisement
Tags :

.