For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणातील युवकांचा आ. वैभव नाईकांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

12:55 PM Oct 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मालवणातील युवकांचा आ  वैभव नाईकांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Advertisement

युवकांमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाची भुरळ

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मालवण शहरातील किनारपट्टी भागातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी. बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मालवण किनारपट्टीवर सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्या समस्या दुर करण्यासाठी व्यावसायिकांच्या पाठीशी राहण्याचे काम आ.वैभव नाईक करतात व पर्यटन व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आ.वैभव नाईक सातत्याने करतात.एक हक्काचे आमदार म्हणून आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून त्याच विश्वासातून आम्ही ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहोत. असे यावेळी प्रवेशकर्त्या युवकांनी सांगितले . यावेळी अमन गोडावले,रामचंद्र कांदळगावकर,शुभम कोचरेकर, निमेश गोवेकर,मिताली मोर्जेकर,तुषार मिसाळ,सिद्धांत देऊलकर,तेजस पोळ यांसह अनेक युवकांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. याप्रसंगी जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, युवती जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, तालुका समन्वयक पुनम चव्हाण,तपस्वी मयेकर, सन्मेश परब,श्री गोवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.