महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकन फुटबॉल संघाचे आव्हान समाप्त

06:52 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृतसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील अमेरिकन पुरूष फुटबॉल संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीता समाप्त झाले. पुरूषांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारात शुक्रवारी उशीरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मोरोक्कोने अमेरिकेचा 4-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

Advertisement

मोरोक्को संघातर्फे सौफियान रहिमी, इलियास अॅकोमाच, अशरफ हकिमी आणि मेहदी माओब यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. या पराभवामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे अमेरिकन फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात आले. आता मोरोक्को आणि स्पेन यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत स्पेनने जपानचा 3-0 असा पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले.

2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकनंतर प्रथमच अमेरिकन पुरूष फुटबॉल संघ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र पुरूषांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारातील प्राथमिक फेरीच्या लढतीमध्ये अर्जेंटिनाने मोरोक्कोचा पराभव केला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश आहे. 2022 च्या कतारमधील फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती.

मोरोक्को आणि अमेरिका यांच्यातील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोरोक्कोने आपले खाते रहिमीच्या गोलवर उघडले. या सामन्याला दोन्ही देशांच्या समर्थकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. रहिमीचा हा या  स्पर्धेतील पाचवा गोल आहे. 33 व्या मिनीटाला मोरोक्कोचा दुसरा गोल इलियास अॅकोमार्चने केला. हकिमीने 70 व्या मिनीटाला मोरोक्कोचा तिसरा गोल केला. सामना संपण्यास 15 मिनीटे बाकी असताना मोरोक्कोचा चौथा गोल पेनल्टीवर मेहदीने नोंदविला होता. अमेरिकेला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article