For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरुष टेटे संघाचे आव्हान समाप्त भारतीय टेटेपटू

06:11 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुरुष टेटे संघाचे आव्हान समाप्त भारतीय टेटेपटू
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

अनुभवी अचंता शरथ कमलने कडवा प्रतिकार केला तरी पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला चीनच्या 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. हरमीत सिंग व मानव ठक्कर यांना पहिल्या सामन्यात मा लाँग व चुकिन वांग यांच्याकडून 2-11, 3-11, 7-11 असा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या एकेरीत फॅन झेंनडाँगविरुद्ध शरथ कमलने शानदार प्रदर्शन करीत पहिला गेम 11-9 असा घेतला. चिनी खेळाडूने स्वत:ला सावरले आणि नंतरची तीनही गेम 11-7, 11-7, 11-5 असे जिंकत चीनला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 24 वर्षीय मानव ठक्करलाही दुसऱ्या एकेरीत चुकिनकडून 9-11, 6-11, 9-11 असा पराभव स्वीकारावा लागला. सोमवारी महिला संघाने रोमानियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

सेलिंगमध्ये नेत्रा अपयशी

Advertisement

भारतीय सेलर नेत्रा कुमाननचे महिलांच्या वैयक्तिक डिंघी सेलिंगमधील आव्हान संपुष्टात आले. विष्णू सरवननप्रमाणे तिला टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. नेत्राने नवव्या पात्रता शर्यतीत 21 वे स्थान मिळविले. पात्रता फेरीत एकूण 10 शर्यती असतात. पण पावसाठी हवामानामुळे दहावी शर्यत रद्द करण्यात आली. वेळेच्या आधारावर टॉप 10 स्थान मिळविणाऱ्यांना पदकाच्या फेरीत प्रवेश दिला जातो. आठव्या शर्यतीनंतर नेत्राने 24 वे तर नवव्या शर्यतीत दहावे स्थान मिळविले होते. यामुळे तिला स्थानांचा फायदा झाला आणि एकंदर 21 वे स्थान मिळाले.

Advertisement
Tags :

.