महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची मुहूर्तमेढ

10:55 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किरण ठाकुर यांच्या हस्ते शुभारंभ : शहापूरच्या जडणघडणीमध्ये वाचनालयाचा वाटा मोठा

Advertisement

बेळगाव : शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य ज्या संस्थेला लाभते, त्या संस्थेने तितकेच महत्त्वाचे कार्यही केलेले असते. कार्यकर्त्यांची तळमळ आणि बळावर संस्था उभी राहते. त्यामुळे संस्थेच्या मागे कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांच्या मागे संस्थेने उभे राहणे आवश्यक आहे. आज आपण सांस्कृतिकदृष्ट्या प्रबळ होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरस्वती वाचनालयाचे कार्य महत्त्वाचे असून संस्थेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे, असे मत वाचनालयाचे विश्वस्त तसेच तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. यंदा कोरे गल्ली, शहापूर येथील सरस्वती वाचनालय शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांची मुहूर्तमेढ किरण ठाकुर यांच्या हस्ते रोवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे, अध्यक्षा स्वरुपा इनामदार, कार्यवाह आर. एम. करडीगुद्दी व संचालक जगदीश कुंटे उपस्थित होते. आज सर्वत्र अराजक निर्माण झाले आहे. विषवृत्ती निर्माण होते आहे. नक्षलवाद वाढतो आहे. अशा वेळी प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागृत करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या आपण प्रबळ व्हायला हवे. परिणामी तशी मोठी चळवळ आपल्याला करावी लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

ऋण आमच्या निरंतर स्मरणात

स्वरुपा इनामदार यांनी वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला. एक काळ असा होता, जेव्हा संस्था अडचणीत होती, अशा वेळी किरण ठाकुर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे वाचनालयाचे अस्तित्व अबाधित राहिले. हे ऋण आमच्या निरंतर स्मरणात असणार आहे, असे सांगितले. प्रारंभी संजना पाटील हिने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर किरण ठाकुर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. ऋषिकेश हेर्लेकर व सहकाऱ्यांनी वेदोक्तमंत्रघोष म्हटले. यावेळी वाचनालयाचे कायदे सल्लागार अॅड. अजय सुनाळकर यांची समर्थ सोसायटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालन व आभार प्रियांका केळकर यांनी मानले.

सर्वांचाच हातभार...

किरण ठाकुर म्हणाले, वाचनालयाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. शहापूरच्या जडणघडणीमध्ये वाचनालयाचा वाटा मोठा आहे. तत्कालिन संस्थानिक पटवर्धन यांचा दृष्टिकोन, समाजाभिमुखता त्यांच्या पुढाकाराने वाचनालय सुरू झाले. ही जुनी संस्था ऊर्जितावस्थेला नेण्याचे प्रयत्न अनेकांनी केले आहेत. या  शतकोत्तर सुवर्णमहोत्सवासाठी 15 कोटी जमा करण्याचा संकल्प आपण करूया.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article