महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव वेगाने कार चालून झाडावर आदळली

05:06 PM Jan 28, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

दक्षिण सोलापूर : 

Advertisement

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औज (मंद्रूप) या ठिकाणी फैसल सरकाझी, श्रीमंत पुजारी, सादीक शेख, शुभम कोकरे असे चार मित्र औज गावाकडे जात होते. भरधाव वेगाने कार चालून झाडावर आदळली असून यामध्ये दोघे गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी आहेत. जखमींना सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरहून औज (मंद्रूप)कडे जात असताना वळणावर भरधाव सुटलेल्या कार गाडीने ड्रायव्हरचा तोल सोडल्याने झाडावर जाऊन आदळली.  गावातीलच शेतकरी व गावकऱ्यांनी या चौघांना ॲम्बुलन्स बोलावून सोलापूरला पाठवून दिले. सध्या दोघांची प्रकृती गंभीर असून दोघांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास मंद्रूप पोलीस करत आहेत.

मंन्द्रुप ते औज गावाकडे जाताना स्पीडमध्ये कारचा  ब्रेक फेल झाल्याने गाडी रोडच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून ऊसाच्या शेतात पलटी होऊन अपघात झाला आहे. ही कार गाडी सुमारे तीस फूट लांब उसाच्या शेतात जाऊन आढळले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia