वर्गमित्राने मानसिक छळ केल्याने तरुणीने घेतला टोकाचा निर्णय
तरुणीच्या मृत्यूचे गूढ, तब्बल दिड महिन्यांतर आले पुढे
पिंपरी
पिंपरीतील एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यूचे कारण तब्बल दीड महिन्यानंतर समोर आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मोबाईलमध्ये तीन व्हाईस मेसेजीस रेकॉर्ड करून ठेवले होते. ते मेसेज तिने तिच्या मित्र-मैत्रिणींना पाठवले होते. हे मेसेज तिच्या पालकांना आणि पोलिसांना मिळाल्यानंतर तिच्या आत्महत्येमागचे कारण कळाले. त्यानंतर पोलिसांनी तिचा वर्गमित्र असलेल्या आरोपीला अटक केली.
सहिती कलुगोटाला रेड्डी (२०, रा. वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव होते. या प्रकरणी तरुणीचे वडील कलुगोटाला रेड्डी यांना वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे (रा. आकुर्डी) या सहितीच्या वर्गमित्र असणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिती हिने ५ जानेवारी रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ती आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिकत होती.
ही घटना कळल्यानंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, सहितीच्या मित्र परिवाराने तिच्या कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा उघडकिस आला. मृत्यूपूर्वी सहितीने आपल्या मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील एका मित्राचा नंबर शेअर केला होता.