For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार थेट पिकअप शेडमध्ये घुसली

11:50 AM Nov 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कार थेट पिकअप शेडमध्ये घुसली
Advertisement

युवती गंभीर जखमी ; नांदगाव येथील अपघात

Advertisement

कणकवली‌ : वार्ताहर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रत्नागिरीतून गोव्याला जात असलेली स्विप्ट कार महामार्ग सोडून थेट पिकअप शेडमध्ये घुसली. नांदगांव दत्तमंदिरानजीक शुक्रवारी सकाळी ८.१५ वा. सुमारास झालेल्या या अपघातात पिकअप शेडमध्ये एसटी बसची वाट बघत उभी असलेली प्रेरणा राजेंद्र तांबे (२२, नांदगांव - बौद्धवाडी) ही युवती जखमी झाली. तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्या. तिच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिकअप शेडमध्ये बसलेल्या आणखी एका युवतीलाही किरकोळ दुखापत झाली. दरम्यान कारच्या धडकेने पिकअप शेड पूर्णतः उद्ध्वस्त झाली. त्यानंतर कार तशीच पुढे येऊन महामार्गावर कलंडली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. पिकअप शेड आणि महामार्ग यामधील अंतर खूपच कमी आहे. पिकअप शेड महामार्गापासून थोड्या दूर असाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी येथे येत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणची मंडळी तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.