महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठोसेघर रस्त्यावरून दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली! जखमींना अंबवडे येथील युवकांनी बाहेर काढले

04:11 PM Sep 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कास वार्ताहर

पुण्याहून ठोसेघरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चार चाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला सुमारे 200 फूट खोलदरीत कोसळली त्यांना तात्काळ रेस्क्यू करण्यात यश आले.

Advertisement

सविस्तर घटना अशी की पुणे येथील पर्यटक ठोसेघर चाळकेवाडी परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेले होते तेथून सुमारे साडे अकराच्या दरम्यान परत येत असताना ज्या ठिकाणी उरमोडी धरणाचा व्ह्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात त्या वळणावरच ठोसेघर होऊन सातारच्या दिशेने येत असताना दरीचा अंदाज न आल्याने m h 12 f.f. 4 514ही गाडी थेट रस्ता सोडून खोल दरीत कोसळली. ही घटना या ठिकाणी उभी असलेल्या युवकांनी पाहिली त्यांनी तात्काळ ही घटना राजू भैया भोसले तसेच पोलीस निरीक्षक तांबे यांना कळवली त्यांनी तात्काळ मदतीसाठी चक्र फिरवली खोल दरीत जाऊन. अंबवडे येथील नितीन देशमुख ,निलेश देशमुख ,सागर देशमुख, विजय जिमन यांनी त्यांना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली गाडीतील दोन युवक एक महिला जास्त जखमी होती भेदरलेल्या जखमी महिलेला त्यांनी दिलासा देत बाहेर काढले तसेच जखमींना ॲम्बुलन्स मध्ये चढवले यावेळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी ही उपस्थित होते जखमींना तात्काळ मदत मिळाल्याने सुदैवाने जखमींचे प्राण वाचले.

Advertisement

Advertisement
Tags :
tarun bharat newsToseghar road Ambwade
Next Article